Sat, Apr 20, 2019 18:34होमपेज › Solapur › सोलापूरच्या टीमचा माऊंट एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रेक

सोलापूरच्या टीमचा माऊंट एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रेक

Published On: Apr 25 2018 11:55PM | Last Updated: Apr 25 2018 10:36PMसोलापूर ः प्रतिनिधी

सोलापूरची पहिली टीम माऊंट एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रेक करणार असल्याची माहिती एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 27 एप्रिल रोजी  सोलापूरहून नेपाळकडे टीम जणार आहे.  या ट्रेकमधून ‘मानवी शरीरावर समुद्रसपाटीपासून उंचीचा होणारा परिणाम’ यावर संशोधन होणार आहे. त्यासाठी ट्रेकमध्ये सहभागी टिममधील सर्वांच्या शारीरिक तपासण्या केल्या आहेत. कारण हा एव्हरेस्ट बेसकॅम्प 18 हजार फूट उंचीवर आहे. या ट्रेकसाठी 15 दिवस लागणार आहेत. या ट्रेकमध्ये डॉक्टर सुनील पट्टे, डॉक्टर सागर गोपाळे, माधवी मिनासे, बालाजी जाधव, किरण जाधव, वैभव ऐवळे, बाळकृष्ण जाधव यांचा सहभाग आहे. सोलापूरची एक टीमच स्वतंत्रपणे ट्रेक करणार असून ही मोहीम युनायटेड नेशन्सच्या जागतिक गोल्ससाठी समर्पित असून यातून अनेक सामाजिक विषयांचा जागर केला जाणार आहे.

या पत्रकार परिषदेस डॉक्टर सुनील पट्टे आणि डॉक्टर सागर गोपाळे उपस्थित होते.