Wed, Jul 24, 2019 13:00होमपेज › Solapur › नूतन कुलगुरू घेणार उद्या पदभार

नूतन कुलगुरू घेणार उद्या पदभार

Published On: May 05 2018 12:53AM | Last Updated: May 04 2018 10:59PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. मृणालिनी फडणवीस यांची निवड राज्यपालांनी केली आहे. त्या रविवारी  कुलगुरूपदाचा पदभार घेणार असल्याचे कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले.

सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2017 रोजी संपला. त्यानंतर कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू असल्याने गेले 4 महिने हे पद रिक्‍त होते. याठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर प्रभारी म्हणून काम पाहात होते. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोण येणार याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच रंगली होती. मात्र राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी 3 मे रोजी नागपूर येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्‍ती केल्याची घोषणा केली आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

डॉ. मृणालिनी फडणवीस या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार येत्या रविवार, 6 मे रोजी सकाळी 11 वाजता प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्याकडून घेणार आहेत. सोलापूर विद्यापीठ त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. यावेळी विद्यापीठातील प्रमुख सर्व अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत.