होमपेज › Solapur › होमगार्डच्या 325 जागांसाठी 2500 पेक्षा जास्त उमेदवार

होमगार्डच्या 325 जागांसाठी 2500 पेक्षा जास्त उमेदवार

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 9:53PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यासाठी होमगार्ड सदस्य नोंदणीची प्रक्रिया सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी सुरु झाली. सोलापूर जिल्ह्यासाठी 204 पुरुष, तर 121 महिला होमगार्डची नोंदणी करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी नव्याने होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरु झाली. या नोंदणी प्रक्रियेसाठी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 2500 पेक्षा उमेदवारांनी गर्दी केली होती. गुरुवारी सकाळी पोलिस मुख्यालयात उमेदवारांच्या  कागदपत्रांची  व शैक्षणिक पात्रता पाहून शारीरिक चाचणीसाठी सोडण्यात आले. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पुरुष व महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. 

महिलांची 800 मीटर धावण्याची चाचणीही पूर्ण झाली असून पुरुषांची 1600 मीटर धावण्याची चाचणीही सोलापूर विद्यापीठाजवळील हिरज रस्त्यावर शुक्रवारी सकाळी घेण्यात येणार आहे.
या नोंदणी प्रक्रियेसाठी अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या नेतृत्वाखाली 5 पोलिस निरीक्षक, 15 पोलिस उपनिरीक्षक, 11 लिपीक आणि सुमारे 100 पेक्षा पोलिस कर्मचारी परिश्रम घेत आहेत.