Tue, Sep 25, 2018 10:34होमपेज › Solapur › सोलापुरात महिलेचा विनयभंग 

सोलापुरात महिलेचा विनयभंग 

Published On: May 30 2018 11:11PM | Last Updated: May 30 2018 10:46PMसोलापूर : 

पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग करणार्‍याविरुद्ध  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर ढाले (रा. प्रभाकर वस्ती, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून याबाबत पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. यातील पीडित महिला ही सोमवारी सायंकाळी  घरासमोर थांबली असताना शेखर ढाले हा आला. त्याने पीडित महिलेला तुझ्या भावाने 20 हजार रुपये घेतलेेले असून ते दे असे म्हणून तिला अश्‍लील शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केला. म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक देशमाने तपास करीत आहेत.