होमपेज › Solapur › सर्वांबरोबर दर देऊनही लोकनेतेची सांपत्तिक स्थिती चांगली 

सर्वांबरोबर दर देऊनही लोकनेतेची सांपत्तिक स्थिती चांगली 

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 8:59PM

बुकमार्क करा
मोहोळ : प्रतिनिधी 

राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत लोकनेते कारखान्याबाबतीत राबविलेली काटकसर आणि पारदर्शक कारभार उल्लेखनीय आहे. त्यामुळेच इतर कारखान्यांबरोबरीने ऊसदर देऊनही लोकनेते कारखान्याची सांपत्तिक स्थिती तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नंबर वन आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य राजूबापू पाटील यांनी काढले.

लोकनेते कारखान्याच्या 3 लाख 57 हजार 777 व्या पोत्याचे पूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी माजी आ. राजन पाटील-अनगरकर, आदित्य गोरे, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील-अनगरकर, माजी उपसभापती मानाजीबापू माने, सायरस जॉल, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील-अनगरकर उपस्थित होते. 

यावेळी पार्थ पवार यांनी कारखानास्थळाची पाहणी करुन चेअरमन बाळराजे पाटील यांच्याकडून कारखान्याच्या गौरवशाली वाटचालीची माहिती घेतली. बाळराजे पाटील म्हणाले की, तालुक्यात एकमेव साखर कारखाना असल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी आमदार  राजन पाटील यांनी अनगरच्या माळरानावर लोकनेते कारखाना उभा केला. या उभारणीसाठी पाटील कुटुंबियांचे मार्गदर्शक शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि राज्याचे नेते अजित पवारांनी मोलाची साथ देत सर्वतोपरी मदत केली म्हणूनच हा कारखाना उभारला.

यावेळी लोकनेतेचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, जि.प. सदस्य उमेश पाटील, मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जि.प. सदस्य शिवाजी सोनवणे, प्रमोदबापू डोके, नगरसेवक मुश्ताक अहमद शेख, मुकेश बचुटे, संतोष सुरवसे,  शुक्राचार्य हावळे, बाळासाहेब शेळके, दीपक माळी, नानासाहेब डोंगरे, अमोल चव्हाण, राजशेखर पाटील, माजी सभापती भारत गायकवाड, सुदर्शन कादे, प्रकाश कुलकर्णी, राजशेखर गायकवाड, सोमनाथ म्हेत्रे, संदीप गुंड, अनंत उरणे उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेव माने यांनी, तर आभार अजिंक्यराणा पाटील-अनगरकर यांनी मानले.