Wed, Nov 14, 2018 05:58होमपेज › Solapur › कर्मचार्‍यांच्या अडचणी दूर करू : मंत्री जानकर

कर्मचार्‍यांच्या अडचणी दूर करू : मंत्री जानकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मोडनिंब : प्रतिनिधी

राज्यातील  पशुसंर्वधन विभागाकडील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या अडीअडचणींची मला जवळून कल्पना आहे. त्याचा पाठपुरावा करून कायमच्या दूर करण्याचा  माझा प्रयत्न राहील तसेच या विभागाकडील रिक्त जागा तातडीने भरण्याची कारवाई सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत यातील एकही जागा यापुढे रिकामी  राहणार नाही, अशी ग्वाही पशुसंवर्धन व कृषीमंत्री ना. महादेवराव जानकर यांनी दिली.

पटवर्धनकुरोली, ता. पंढरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उद्घाटन कार्यक्रमास ना. जानकर आले होते. त्यावेळी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्यावतीने डॉ.विकास तांबडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
त्यावेळी जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी करण पराग,  विस्तार अधिकारी डॉ. चंद्रकात निंबाळकर, डॉ. आसबे, डॉ. रवींद्र भापकर, डॉ.औदुंबर, व्यवहारे, डॉ. मोहिते, डॉ.गायकवाड, डॉ. भिंगारे, डॉ. देशमुख, डॉ. होनराव आदी मान्यवर उपस्थित होते.              


  •