Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Solapur › पंढरीत धावते अत्याधुनिक सुविधांयुक्‍त डिजिटल रिक्षा

पंढरीत धावते अत्याधुनिक सुविधांयुक्‍त डिजिटल रिक्षा

Published On: May 23 2018 12:10AM | Last Updated: May 22 2018 11:10PMपंढरपूर : प्रतिनिधी 

पंढरीत   भाविक व नागरिकांसाठी अत्याधुनिक सेवा सुविधांनीयुक्‍त रिक्षातून सफर घडवून आणण्याचे काम रिक्षा चालक विष्णू शेटे करीत आहेत. अत्याधुनिक रिक्षात हाय-फाय लोकांना सेवा देण्याबरोबर अंध अपंग व गरोदर महिलांसाठी मोफत सेवाही दिली जात आहे. गेल्या चार वर्षांपासून ही अविरत सेवा दिली जात असल्याने अंध अपंगासाठी मायेचा आधार ठरत असलेल्या या रिक्षाची क्रेझ अनेकांना भुरळ घालत आहे.

शहरातील अनिल नगर भागात राहणारा विष्णू यशवंत शेटे हा जेमतेम बारावी शिकलेला युवक रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात उतरला.   भाविकासह नागरिकांना सेवा देण्याचे काम करीत आहे.  रिक्षात प्रवाशांच्या गरजेनुसार अत्याधुनिक सेवा सुविधा कार्यरत ठेवल्या आहेत. दुर्धर आजाराने व एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी आपल्या रिक्षात दान पेटी बसवून एच.आय.व्ही. बाधीत मुलांच्या संगोपनास हातभार लावला जात आहे. त्याच्या या सामाजिक भानाचे कौतुक केले जात आहे. अधिक महिना सुरू असल्याने रिक्षावर श्री विठ्ठलाची मूर्ती दिमाखात उभारली आहे. महापुरुषांची जयंती साजरी करताना वेळ काळानुसार रिक्षावर मूर्त्या बसवल्या जात आहेत. यातून सर्वधर्म समभाव जोपासण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळेच एम.एच. 13 ए.डी. 0641 या रिक्षाची भाविक, प्रवासी व नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहतात.