Sun, Nov 18, 2018 05:04होमपेज › Solapur › तुर्भे एमआयडीसीतील मोडेको इंडिया भीषण आग 

तुर्भे एमआयडीसीतील मोडेको इंडिया भीषण आग 

Published On: Dec 17 2017 8:23PM | Last Updated: Dec 17 2017 8:23PM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी 

तुर्भे एमआयडीसीतील मोडेको इंडिया  या कंपनीमध्ये मोठा स्फोट होऊन कंपनीला भीषण आग लागली. या स्फोटामुळे लागलेल्या आगीची तीव्रता खूप मोठी असल्याने आजूबाजूच्या कंपन्याही खाली करण्यात आल्यात आहेत. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या कंपनीत केमिकलच्या ड्रमचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. या केमिकल ड्रमचे स्फोट होत असल्याने शेजारील कंपनीला आग लागण्याची शक्यता आहे.

या आगीत कंपनीतील तीन कामगार गंभीर जखमी झाले असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.