Tue, Mar 19, 2019 20:48होमपेज › Solapur › संदीप पवार खून प्रकरणातील आरोपींना मोक्का

संदीप पवार खून प्रकरणातील आरोपींना मोक्का

Published On: Apr 27 2018 10:32PM | Last Updated: Apr 27 2018 10:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खून प्रकरणातील आरोपींना पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने मोक्का कायद्या अंतर्गत 7 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपींना आज पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयापुढे उभे करण्यात आले होते. यावेळी आरोपींना ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी भाजपचा जि प सदस्य गोपाळ अंकुशराव याच्यावर मात्र अजूनही मोक्का अंतर्गत कारवाई झालेली नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने सरजी वर ही कारवाई अद्याप झाली नसल्याचे सूत्रांकडून समजते. 

अक्षय उर्फ बबलू सुरवसे, बंडू बरणगुळे, पुंडलिक वनारे, मनोज शिरसिकर, भक्तराज धुमाळ यांच्यासह त्यांचे अन्य ४ साथीदार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Tags : solapur, pudhari, sandip pawar, mocca