Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Solapur › ‘इंद्रधनुष्य’ चौथा टप्पा सुरू होणार

‘इंद्रधनुष्य’ चौथा टप्पा सुरू होणार

Published On: Jan 07 2018 2:04AM | Last Updated: Jan 06 2018 11:23PM

बुकमार्क करा
सोलापूर :प्रतिनिधी

शहरात विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा चौथा टप्पा 8 जानेवारी ते 15 जानेवारी याकालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या  कार्यालयात गुरुवारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क कमिटीची बैठक झाली. यावेळी सोलापूर शहरामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा चौथा टप्पा  हा 8 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्ण वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. 0 ते 2 वयोगटातील मुले, गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा 28 जानेवारी तसेच 11 मार्च रोजी राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील  एक लाख 29 हजार बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. याकरिता 370 बूथची सोय करण्यात नियोजन आहे. याकामी मनपाच्या सेवकांबरोबरच आशा वर्कर, खासगी नर्स, एनएसएस, एनवायके, एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.  यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवर, उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील, आरोग्य समिती सभापती संतोष भोसले, मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंखे, पाखर संकुलच्या अध्यक्षा शुभंगी बुवा, जिल्हा लसीकरण अधिकारी व आरोग्य अधिकारी आदी मनपा अधिकारी उपस्थित होते.