Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Solapur › लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Published On: Aug 15 2018 1:27AM | Last Updated: Aug 14 2018 10:45PMसोलापूर ः प्रतिनिधी

विजापूर रस्त्यावरील सैफुल येथील सवेरानगरात लग्नाचे आमिष दाखवून एक वर्षापासून पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी बलात्कार करुन कॉलेजमधून फूस लावून पुण्यास पळवून नेल्याप्रकरणी अनिल अशोक  भूशेट्टी  (वय 20, रा. विजापूर रोड, सैफुल, वैष्णवीनगर) याच्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी ही दहावीत शिकत असल्यापासून आरोपी तिचा पाठलाग करुन, तिला वारंवार त्रास देऊन 11 ऑगस्ट रोजी पुण्याला पळवून घेऊन गेला. गेल्या एक वर्षापासून पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आता मुलगी बारावीत शिकत आहे. ही फिर्याद  पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिली आहे. 

पीडित मुलगी ही 11 ऑगस्ट रोजी जुळे सोलापूर येथील एका महाविद्यालयात नेहमीप्रमाणे शिकण्यास गेली. दुपारी नेहमीप्रमाणे आई ही मुलीला आणण्याकरिता महाविद्यालयात गेली असता मुलगी नसल्याचे समजले. त्यानंतर शोधशोध करुन महाविद्यालयात विचारले असता मुलगी सकाळच्या पहिल्या तासापासून निघून गेल्याचे समजले. 

शोधशोध केली असता आरोपीने मुलीला फूस लावून पुण्याला पळवून नेले असून पुणे-अक्‍कलकोट एसटीने परत येत असल्याचे कळाले. पीडित मुलीचे नातेवाईक मुलीला आणण्यासाठी पुण्याच्या दिशेने गेले. टेंभुर्णी बसस्थानकावर मुलगी सापडली. मुलीला गाडीत बसवून आयटीआय पोलिस चौकीत आणून फिर्याद देण्यात आली. पीडितेने सर्व हकीकत सांगितली. दहावीत असतानाच लग्नाचे आमिष दाखवून  बलात्कार झाल्याचे सांगितले.