Tue, Jul 23, 2019 10:30



होमपेज › Solapur › ना. मंत्री शिवतारे यांचे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन करण्याचे आदेश

ना. मंत्री शिवतारे यांचे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन करण्याचे आदेश

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 10:45PM



करमाळा : तालुका प्रतिनिधी 

करमाळा तालुक्यातील अठरा गावांमधील दहा हजार हेक्टर शेतीसाठी वरदायिनी ठरणार्‍या दहिगाव उपसा जलसिंचन योजनेचे उद्घाटन करून ही योजना कार्यान्वित करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना   दिले असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली आहे.    

      
अनेक वर्षे रेंगाळलेल्या दहिगाव सिंचन योजनेचे काम पूर्णत्वास आलेले असतानादेखील केवळ राजकीय श्रेय घेण्याच्या हेतूने ही योजना उद्घाटन करून कार्यान्वित करणे लांबविण्याचा संबंधित लोकप्रतिनिधींचा डाव आहे. या प्रकारामुळे या प्रकल्पाचे लाभधारक वंचित राहणार असल्याचे लक्षात घेऊन जि.प. अध्यक्ष शिंदे यांनी 15 जानेवारी रोजी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी बैठक लावा, असे पत्र ना. शिवदारे यांना दिले होते. त्यानुसार ना. शिवतारे यांनी शिंदे यांच्यासह बैठक आयोजित करून या योजनेचे ताबडतोब उद्घाटन करून योजना कार्यान्वित करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिलेले आहेत.

याविषयी माहिती देताना   जि.प. अध्यक्ष शिंदे यांनी योजना पूर्ण झालेली असताना ही योजना कार्यान्वित होऊ न देण्याचा राजकीय डाव आता हाणून पाडल्याने योजना लवकरच सुरू होईल, असे सांगून करमाळा तालुक्यातील जनतेने  टाकलेल्या विश्‍वासाला आपण तडा जाऊ देणार नाही, असे सांगितले. यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामनराव बदे, तात्यासाहेब मस्कर, माजी जि. प. सदस्य चंद्रकात सरडे, उध्दव माळी, सुरेश पालवे, माढा पं.स. सदस्य धनराज शिंदे, मकाई कारखान्याचे माजी संचालक विवेक येवले, विलास राऊत, तानाजी झोळ, सूर्यकांत पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, सुनील सावंत, अर्बनचे व्हाईस चेअरमन फारूक जमादार, सुजित बागल, नगरसेवक प्रवीण जाधव, महादेव फंड आदी उपस्थित होते.