Sun, Apr 21, 2019 06:17होमपेज › Solapur › विवाहितेचा छळ; सासूविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ; सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 9:12PMसोलापूर  प्रतिनिधी

 माहेरहून सोन्याची अंगठी, मानापानासाठी पन्नास हजार रुपये घेवून ये म्हणून शारीरिक, मानसिक जाचहाट केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
उमा आबासाहेब उर्फ नागेश गवळी (वय 28, रा. सुखशांती हौसिंग सोसायटी, चिखली प्राधिकरण घरकुल चिखली, पुणे, सध्या रा. एनजी मिल चाळ, मुरारजी पेठ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पती आबासाहेब उर्फ नागेश किसनराव गवळी, सासू रुक्मिणी किसनराव गवळी (दोघे रा. सुखशांती हौसिंग सोसायटी चिखली प्राधिकरण, घरकुल चिखली, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादीचे 16 मे 2010 रोजी लग्न झाले. त्यानंतर दोन महिन्यानंतर 24 मे 2018 पर्यंत वेळोवेळी पती, सासूने त्रास देवून शारीरिक, मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.