Wed, Jun 26, 2019 18:00होमपेज › Solapur › सोलापूर : महाराष्ट्र बंदला प्रतिसाद; जिल्ह्यात चक्काजाम

सोलापूर : महाराष्ट्र बंदला प्रतिसाद; जिल्ह्यात चक्काजाम

Published On: Aug 09 2018 12:44PM | Last Updated: Aug 09 2018 12:58PMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने चक्काजाम करण्यात आले आहे.

Updates

माळीनगर येथे सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन... या आंदोलनावेळी आरक्षणाची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी 

Image may contain: one or more people, motorcycle, sky and outdoor

बोंडले (ता.माळशिरस) येथे श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री.संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन

तोंडले, बोंडले, दसूर, खळवे या भागातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित

चक्काजाम दरम्यान काही मराठा बांधव या मार्गावर झोपले

Image may contain: 6 people, people smiling, people sitting, shoes and outdoor

दरम्यान आज तोंडले, बोंडले, दसुर गावातील संपुर्ण व्यवहार १००% बंद आहेत. 

Image may contain: motorcycle, sky and outdoor

पुणे - पंढरपुर या पालखी महामार्गांवर चक्काजाम आंदोलान असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद

माढा शहरासह ग्रामीण भागातील उपळाई बुद्रूक, दारफळ, विठ्ठलवाडी येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

माढा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून सकाळी साडेआठच्या सुमारास रास्ता रोको

शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा बंद; सकाळी दहाच्या सुमारास शहरातून तरुणांची मोटारसायकल रॅली

 

उपळाई बुद्रूक येथे पहाटे पाच वाजताच तरुणांनी मोटारसायकल रॅली 

माढा ते शेटफळ रस्त्यावर टायर पेटवून व रस्त्यावर चिलार बाभळ टाकून रास्ता रोको 

दारफळ व विठ्ठलवाडी येथे दुकाने बंद करुन टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन 

Image may contain: one or more people, outdoor and nature

बंद शांततेत सुरू असून एस. टी. वहातूक बंदच ठेवण्यात आली

करकंब : आरक्षण मागणीवरून बंद व चक्काजाम आंदोलनास चांगला प्रतिसाद

आंदोलनास मुस्लिम, धनगर समाजाबरोबर इतर समाजाचा पाठिंबा

 सारोळे ता. मोहोळ येथे आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले

नातेपुते येथे मराठा क्रांतीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

मोहोळमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारून महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग 

Image may contain: motorcycle and outdoor