Fri, Jul 19, 2019 22:51होमपेज › Solapur › आ. भालके 10, आ. परिचारक 3, आवताडेंचेे 6 ग्रामपंचायतींवर वर्चस्व

आ. भालके १० आ. परिचारक ३ आवताडेंचेे ६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 1:27AM

बुकमार्क करा
मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

दुसर्‍या टप्प्यात झालेल्या 19 गावांच्या ग्रामपंचायती निवडणुकीत आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे गटाला संमिश्र यश मिळाले आहे. यात आ. भालके गटाने 10 जागी आघाडी घेतली आहे, तर आ. परिचारक गटाला 3 जागी चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, पंचयात समिती, जिल्हा परिषद, सहकारी साखर कारखाना ताब्यात असणार्‍या आवताडे गटाला 6 जागा मिळाल्याने त्यांना समाधान देणारा निकाल लागला नाही.

 मुंढेवाडी या अगोदरच अविरोध झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भालके गटाने बाजी मारली. भारत बेदरे यांनी बठाण येथे वजन कायम ठेवले आहे. सभापती प्रदीप खांडेकर यांनी हिवरगाव येथे वर्चस्व अबाधित ठेवले, तर तालुक्याचे नेते स्व. दत्ताजी भाकरे यांच्या पत्नी शांताबाई भाकरे सरपंच म्हणून  निवडून आल्या आहेत. भालके, आवताडे, परिचारक अशा समिश्र आघाड्या असल्याने निकाला नंतर प्रत्येक गट  आपल्याच गटाचा सरपंच असे दावे करू लागला आहे. आ. भालके यानी शेलेवाड़ी, बठाण, चिक्कलगी, शिरसी, खुपसंगी, नंदुर, उचेठान, मुंढेवाड़ी येथे तर परिचारक गटाने भाळवणी, जंगलगी  निंबोणी , या गावात आपले सरपंच निवडून आणले आहेत.  तसेच आवताडे गटाने ब्रम्हपुरी, हिवरगाव, आंधळगाव, खड़की, अकोले, जुनोनी येथे सत्ता मिळवली. 

बुधवारी सकाळी 8 वाजता  पंढरपुर रोडवरील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीस प्रारंभ झाला .एकूण 18 टेबलवर ही मतमोजणी घेण्यात आली.  संपूर्ण निकाल हाती यायला अकरा वाजले. निकाल ऐकण्यासाठी गोदामा बाहेर ग्रामीण भागातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. निकाल समजताच समर्थकानी जल्लोष करण्यास सुरूवात केली. फटाके आणि ढोल ताशे वाजवत गुलालाची उधळण करण्यात आली. काही उमेदवार संत दामाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत वाजत गाजत आपल्या नेत्यांच्या कार्यालयाकडे गेले. 

 गावनिहाय विजयी  सरपंच   बठाण सरपंच- संजय गुंडोंपंत बळवंतराव, उचेठान सरपंच- दत्तात्रय रावसो गडदे, चिक्कलगी सरपंच- दिनेश मल्लेशा पाटील, नंदुर सरपंच- गुरैया शकरया स्वामी, शिरसी सरपंच- सुरेखा बाबासो गायकवाड़, खुपसंगी सरपंच-संभाजी ज्ञानदेव हेगड़े, शेलेवाड़ी सरपंच-विमल जोतिराम चव्हाण, मुंढेवाड़ी  सरपंच-सविता शिवाजी पाटील, अकोले सरपंच-सुखदेव इंगळे, खड़की सरपंच-सविता बेलदार, जुनोनी सरपंच-मालन जाधव, हिवरगाव सरपंच- रवि खांडेकर, आंधळगाव सरपंच- शांताबाई दत्तात्रय भाकरे, ब्रम्हपुरी सरपंच- मनोज पुजारी, जंगलगी सरपंच-  शशिकला चंद्रकांत चौखंडे, महमदाबाद सरपंच-रतन सुरेश हत्तिकर, जालिहाळ सरपंच-सचिन तमन्ना चौगुले, निंबोनी सरपंच- वंदना आप्पा शिंदे, भाळवणी सरपंच-कमल दामाजी चव्हाण.