होमपेज › Solapur › जुनी पेन्शनसाठी प्रयत्न करणार : खा. राजू शेट्टी

जुनी पेन्शनसाठी प्रयत्न करणार : खा. राजू शेट्टी

Published On: Feb 19 2018 1:19AM | Last Updated: Feb 18 2018 10:46PMमंगळवेढा: तालुका प्रतिनिधी

2019 च्या  निवडणुकीत  शेतकर्‍याच्या मुलांना जुनी पेन्शन  मिळाली  पाहिजे यासाठी    जाहिरनाम्यात  जुनी  पेन्शनचा मुद्दा  समावेश  करून  सर्व  कर्मचार्‍यांना  न्याय  देण्याचा प्रयत्न  करेन, असे मत खा. राजू शेट्टी यांनी व्यक्‍त केले. ते  जुनी पेंशन हक्‍क संघटना डी. सी. पी. एस. धारकांचा स्नेहमेळावा प्रसंगी बोलत होते. 

या वेळी  महिला जिल्हा  संघटक ज्योती  कलुबर्मे,  तालुका महिला  संघटक  यास्मिन तांबोळी,  उपाध्यक्ष  शिवाजी  बेलभंडारे, तालुका  अध्यक्ष  राजेंद्र  कांबळे उपस्थित  होते.  यावेळी  संजय चेळेकर,  दिगंबर  तोडकरी यांनी  मनोगत  व्यक्‍त  केले.  कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विशाल  जाधव  यांनी  व आभार  ज्ञानेश्‍वर  घोडके  यांनी  मानले.