मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या बॅगस व प्रेसमडला लागलेल्या आगीत कारखान्याचे 75 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. श्री संत दामाजी कारखानाच्या कार्यस्थळावर गळीत हंगामाच्या सांगता समारंभाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष समाधान आवताडे, उपाध्यक्ष आंबादास कुलकर्णी व संचालक मंडळासह कामगार, तोडणी वाहतूकदार उपस्थित होते. अचानक दु.2.30 च्या दरम्यान बॅगस डेपोला आग लागली. या आगीच्या भक्षस्थांनी लुज बॅगस व गाठी बांधलेला बॅगस पडला. याची झळ प्रेसमडला लागली.
वार्यामुळे आगीचे लोट वाढू लागले. कारखान्याचे असलेले अग्नीशामक तात्काळ हजर झाले, पण ही वाढलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मंगळवेढा नगरपलिकेचा व लोकनेते शुगर अनगर व पंढरपूर नगरपलिकेचे अग्नीशामकासह शेजारील 10 पाण्याच्या टँकरना पाचारण करण्यात आले. घटनास्थळाला तहसीलदार आप्पासाहेब समींदर यांनी भेट देवून पाहणी केली. या जळीताची फिर्याद कारखान्याचे सुरक्षा रक्षक दयानंद गायकवाड यांनी पोलिसात दाखल केली.
tags : Mangalveda,news,damaji, factory, fire, 75 lakhs, loss,