Wed, Aug 21, 2019 01:55होमपेज › Solapur › माजलगाव तालुक्यात उष्माघाताचा बळी?

माजलगाव तालुक्यात उष्माघाताचा बळी?

Published On: May 11 2018 9:58PM | Last Updated: May 11 2018 8:57PMमाजलगाव : प्रतिनिधी

तालुक्यात सध्या उन्हाचा पारा वाढत असून भाऊसाहेब पोमा चव्हाण (वय 35, रा. गोवर्धननगर तांडा) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सावरगाव छत्रपती कारखान्याजवळ घडली आहे. चव्हाण याचा मृतदेह चार तास जागेवरच पडून राहिला होता. एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने या परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. माजलगाव तालुक्यातील तालखेड परिसरातील गोवर्धन नगर तांड्यावरील येथील बाजार समितीमध्ये रोजंदारीवर काम करणारा भाऊसाहेब चव्हाण हा गेल्या काही दिवसांपूर्वी आजारी असल्याने तो माजलगाव शहरातील एका डॉक्टरांकडे ताप आला म्हणून गेला होता. तेथील उपचार करून आपल्या गावाकडे माजलगाव-गेवराई बसने येत असताना गाडी सावरगाव जवळील छत्रपती साखर कारखान्याजवळ आली असताना गाडीत जादा गर्दी असल्याने भाऊसाहेब यास कसे तरी होऊ लागले म्हणून मोकळा श्‍वास घेण्यासाठी आपल्या गावाजवळ न उतरता  छत्रपती साखर कारखान्याजवळ उतरत असताना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तापमानामुळे भाऊसाहेब चव्हाण यास उष्माघाताचा झटका आल्याने जाग्यावरच पडला.

लोकांनी कुणीतरी दारु पिणारा व्यक्ती खाली पडला असून यामुळे या मयताकडे कुणीच पाहिले नाही. मात्र ही बाब नातेवाईकास समजल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी संशय व्यक्‍त करून या भागातील दुकान, हॉटेलवर दगडफेक केली. यामुळे काल रात्री भाऊसाहेब चव्हाणच्या मृत्युबाबत घातपाताची चर्चा चर्चविली गेल्याने मृत्युचे कारण समजले नसल्याने एकच गोंधळ उडाल्याने चर्चेचे तक्रवितर्क निघाले. शेवटी रात्री उशिरा मयताचे  शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता मयताच्या अंगावर घातपाताच्या कसल्याही खुणा आढळून न आल्याने या मृत्युचे कारण स्पष्ट झाले नाही तरी तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मयताचे नातेवाईक आनंद शिवाजी चव्हाण यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास  सहायक पोलिस उपनिरीक्षक बी.एस.कांबळे  हे करत आहेत.