Wed, Mar 20, 2019 23:38होमपेज › Solapur › अभिनेते मकरंद अनासपुरे सोलापूर विद्यापीठ सिनेटवर

अभिनेते मकरंद अनासपुरे सोलापूर विद्यापीठ सिनेटवर

Published On: Mar 03 2018 9:38PM | Last Updated: Mar 03 2018 9:38PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नामनिर्देशित अधिसभा (सिनेट) सदस्यांची शनिवारी सायंकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली. यामध्ये सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर विद्यापीठ अधिसभा अर्थात सिनेटसाठी अलीकडेच निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यानंतर सर्वांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणकोणाची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता लागली होती. 

दरम्यान, शनिवारी याबाबतची घोषणा करण्यात आली असून या सदस्यामध्ये ॲड. अमोल कळके, प्रा. गजानन धरणे, मोहनजी डांगरे, सिद्धाराम पाटील, डॉ. एम. बी. देशमुख, रेणुका महागावकर, दीपक चव्हाण, मकरंद अनासपुरे यांचा समावेश आहे.