Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Solapur › मोहोळ : महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास धक्काबुक्की

मोहोळ : महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास धक्काबुक्की

Published On: Sep 12 2018 6:02PM | Last Updated: Sep 12 2018 5:45PMमोहोळ : वार्ताहर

महावितरणच्या डी.पी. वरील सी.टी लाईनची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्यास एका शेतकऱ्याने धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवेक आकेन यांनी मोहोळ पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार सज्जन मोहन सातपुते (रा.पाटकूल) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा करुन सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, विवेक आकेन हे विज वितरण केंद्र पेनूर येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ११ सप्टेंबर रोजी ते कर्मचाऱ्यांसह पाटकूल (जाधव वस्ती) वस्ती येथील डी.पी वर निर्माण झालेल्या समस्येची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सदर डी.पी. वर असणारी सी.टी लाईन तुटल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. हे काम करत असताना सज्जन मोहन सातपुते (रा.पाटकूल) हे त्या ठिकाणी आले. व सातपुते यांनी यावेळी आकेन यांना "माझ्या शेतातून बाहेर हो, डी.पी. वरील तार जोडू नको" असे म्हणत शिवीगाळी, धक्काबुक्की करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी विवेक आकेन यांनी आज, बुधवार (दि.१२ सप्टेंबर) मोहोळ पोलिसात तक्रार दाखल केली. यानुसार सज्जन मोहन सातपुते (रा.पाटकूल)  याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.