होमपेज › Solapur › भीमा-कोरेगाव प्रकरण : सोलापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद(व्हिडिओ)

भीमा-कोरेगाव प्रकरण : सोलापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद(व्हिडिओ)

Published On: Jan 03 2018 11:04AM | Last Updated: Jan 03 2018 11:04AM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सकाळच्या टप्प्यात संमिश्र प्रतिसाद मिळला आहे.
शहरातील विविध भागात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळच्या सत्रात काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी शाळा सुरू आहेत. बंदमध्ये विद्यार्थी वाहतूक संघटनेने सहभाग घेतला आहे. त्यामुळे पालकांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे. बंदमध्ये सहभागी झालेल्या संघटना, राजकीय पक्ष यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. परंतु, पोलिसांनी मोर्चास परवानगी नाकारली आहे. 

अकोलेकाटी गावाजवळ बसवर दगडफेकीची घटना घडली. सोलापूर महानगरपालिका परिवहनच्या बसवरही दगडफेक झाली. या बसमध्ये २५ ते ३० विद्यार्थी होते, यातील ५ विद्यार्थ्यांना किरकोळ जखमी झाले आहेत.या प्रकारानंतर खासगी वाहनाने विद्यार्थ्यांना नेहण्यात आले.

शहरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. बार्शी, अकलूज, माळशिरस, सांगोल्‍यासह ठिकठिकाणी सकाळच्या सत्रात दुकाने बंद आहेत.