Mon, Jun 24, 2019 21:12होमपेज › Solapur › भीमा कोरेगावप्रकरणी वेळापुरात कडकडीत बंद

भीमा कोरेगावप्रकरणी वेळापुरात कडकडीत बंद

Published On: Jan 04 2018 1:05AM | Last Updated: Jan 03 2018 8:56PM

बुकमार्क करा
वेळापूर: वार्ताहर

भीमा-कोरेगाव येथील दंगल प्रकरणाचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या बंदच्या हाकेमुळे वेळापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरमधील  सर्व व्यवहार बंद ठेवून व्यापार्‍यांनी सहभाग नोंदविला. या बंदमुळे शहरात शुकशुकाट होता. सांगोला, अकलूज, पुणे व पंढरपूरकडे जाणारी बससेवा तुरळक चालू होती. बसस्थानकावर शुकशुकाट होता. प्रवाशांनी प्रवास करणे टाळले.

शहर व परिसरातील शाळा तसेच सर्व बँका, पाटबंधारे, साबांवि, महावितरण ही कार्यालये सुरू होती. या ठिकाणी नागरिकांची वर्दळ नव्हती. यावेळी  भीमसैनिकांनी निषेध व्यक्‍त केला. शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी वेळापूरचे सपोनि परशुराम कोरके आदींनी फिरुन परस्थितीवर लक्ष ठेवले. तसेच शहर व परिसरातील बसस्थानक, ग्रामपंचायत परिसर, पालखी चौक येथे बंदोबस्त ठेवण्यात आला.