Tue, Apr 23, 2019 06:34होमपेज › Solapur › पिलीव येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिलीव येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Jan 04 2018 1:05AM | Last Updated: Jan 03 2018 8:59PM

बुकमार्क करा
पिलीव : वार्ताहर 

भीमा कोरेगाव येथे विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांवर अज्ञातांनी हल्ला करून वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली होती. या घटनेचा निषेध करून हल्लेखोर गुन्हेगारांवर कडक व कठोर कारवाई व्हावी व घटनेची न्यायालयीन चौकशी होऊन मयताच्या वारसांना नुकसानभरपाई व पुनर्वसन व्हावे, यासाठी पिलीव येथे रिपाइंतर्फे (आठवले गट) विकास धाईजे यांच्या मार्गदशर्ंनाखाली रणजित सातपुते व इतर बहुजन समाजाच्या संघटनेच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. 

तसेच युवराज सातपुते व कार्यकर्त्यांनी पिलीव बाजारपेठेतून निषेध मोर्चा काढून कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन पोलिस खात्याला देण्यात आले होते. मात्र दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सातारा पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको केला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई व्हावी व तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशा आशयाचे निवेदन सर्व संघटना व कार्यकर्त्यांतर्फे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार याना देण्यात आले.

यावेळी ए.एस.आय. मुन्‍ना केंगार, पोलिस नाईक अभिजित मोहोळकर, अमित जाधव, एस.आर.पी. व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ वादविवाद वगळता पिलीव शंभर टक्के बंद होते. मात्र दवाखाने व  मेडिकल स्टोअर, बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालये, शाळा, विद्यालये सुरळीत चालू होती.