Mon, Apr 22, 2019 15:42होमपेज › Solapur › माढ्यात बारा ग्रामपंचायतींवर संमिश्र कौल

माढ्यात बारा ग्रामपंचायतींवर संमिश्र कौल

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 9:12PM

बुकमार्क करा
माढा ः वार्ताहर

माढा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र स्वरुपाचा कौल दिला. कन्हेरगाव, अंजनगाव, वडशिंगे, मुंगशी या ग्रामपंचायतीत थेट सत्तांतर झाले. टेंभुर्णी, आढेगाव, पिंपळखुंटे याठिकाणी सरपंच एकाचा तर बहुमत विरोधकांकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वडोली ग्रामपंचायत वगळता इतर सर्व ग्रामपंचायतीत शिंदे बंधूंचीच सत्ता आली आहे. लक्षवेधी ठरलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीत खा. मोहिते-पाटील गटाचे अ‍ॅड. कृष्णात बोबडे, आ. बबनराव शिंदे गटाचे प्रभाकर कुटे यांच्या गटात लढत होती. याठिकाणी सरपंच कुटेंचा, तर बहुमत बोबडे यांचे, असा कौल मतदारांनी दिला. माजी जि.प. सदस्या चित्रा वाघ या आढेगावात, माजी पं. स. सदस्य आप्पासाहेब वाघमोडे हे अंजनगाव खे. येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. जि.प. सदस्या अंजनादेवी शिवाजी पाटील यांनी चांदज ग्रामपंचायतीत विरोधकांना एकही जागा मिळू दिली नाही.

अनेक दिग्गजांना धक्का  टेंभुर्णी येथे अ‍ॅड. कृष्णात बोबडे यांचे पुत्र नागेश व स्नुषा सुरजा योगेश बोबडे यांच्यासह बंडखोरी केलेले त्यांचे पुतणे ऋषिकेश बोबडे, माजी सभापती रणजितसिंह शिंदे यांचे खंदे समर्थक रामभाऊ शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला.  पिंपळखुंटे येथे कुर्मदास कारखान्याचे व्हा. चेअरमन शिरीष पाटील यांच्या पत्नी संजीवनी पाटील पराभूत झाल्या. वडशिंगे येथे माजी पं. स. सदस्य उमा कदम यांचे पुत्र रोहित यांचा पराभव झाला. अंजनगावात आ. बबनराव शिंदे यांचे समर्थक सुरेश चौगुले यांचा पराभव झाला. नोटाने घोळ झाला  टेंभुर्णी येथे सरपंचपदाचा उमेदवार 84 मतांनी विजयी झाला. येथे 109 जणांनी नोटांचा वापर केला. आढेगावात सरपंचपदी चित्रा वाघ अवघ्या 9 मतांनी विजयी झाल्या. याठिकाणी 13 जणांनी नोटा या पर्यायाचा वापर केला. त्यामुळे याठिकाणी नोटाने घोळ झाल्याची चर्चा रंगली होती. 

माढा ः वार्ताहर

ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच व सदस्य कंसात त्यांना मिळालेली मते - • वडशिंगे- सरपंच- जयश्री ठोंबरे- (974), सदस्य अफसर शेख (380), दत्तात्रय जाधव (374), विमल गुडेकर (345), उदयसिंह कदम (332), शानू कोरबू(307), सगजनाबाई कदम (308), अमोल खंडागळे (357), विद्या पाटील(375), संगीता शिंदे(373) •  कन्हेरगाव- सरपंच- मनिषा चव्हाण (1019), सदस्य सोमनाथ लोखंडे (418), प्रसाद मोरे(276), विमल भरगंडे(281), बाळासाहेब हांडे (200), रेश्मा कदम(212), दीपक डोके (343), संगिता धोत्रे (278), पूजा मोरे (300), दत्तात्रय माने(281), पुष्पा टकले(323), रतन खोचरे(218). • चांदज- सरपंच- बळीराम हेगडकर (1116), सदस्य - नितीन लोंढे(507), मनिषा भोई(614), आक्काबाई घोडके (635), मारुती पाटील(340), तानाजी गाडे(342), शांताबाई चोरमोले(345), महेश गाडे (215), रूपाली टकले(189), उज्ज्वला हेगडकर(205).

 • अंजनगाव खेलोबा- सरपंच - आप्पासाहेब वाघमोडे(1371), सदस्य- अजिनाथ इंगळे (264), ताई भडकवाड (251), गोरख पांढरे(189), लताबाई गडेकर (192), हिराचंद्र रावडे (271), वैष्णवी गायकवाड(308), रेश्मा पाटेकर (352), गणेश वाघमोडे(268), धनाजी पाटील(249), कविता वाघमोडे(242), भागवत चौघुले (419), सुशीला कोळेकर (379), सज्जनबाई पाटेकर(444).  • तुळशी- सरपंच- राजामती माळी(1256), सदस्य- धनाजी वाघमारे (252), सचिन वाघमारे(168), उषा लोखंडे(234), सोमनाथ बोचरे(254), शारदा शिंदे (261), शरद मोरे (460), वनिता माळी (410), संगिता अनवते(397), प्रवीण वाणी(346), जालिंदर चव्हाण(376), विजया मोरे (356), निलावती माळी (476), अलका माने (440). • आढेगाव - सरपंच - चित्रा वाघ (1063),  सदस्य- सोनबा जाधव (434), प्रतिभा गायकवाड(422), प्रतिभा जवळगे (381), दीपक जाधव (233), प्रियांका पाटील (221), पांडुरंग व्यवहारे (249), सोनाली खरात (248), सुंदर चव्हाण(242), आबासाहेब वाघ(295), गोरख

वाघ(268), शोभा वाघ(271). • लोणी - नाडी  - सरपंच - विजया तांबे (736),  सदस्य- धम्मपाल दणाणे (277), काजल भागवत (267), बापू खरात (220), सखुबाई उबाळे (236), किसन लवटे (237), साधना रूपनवर(252), सुषमा गोफणे(245). • मुंगशी- सरपंच- किरण मोरे(532), सदस्य- सूर्यकांत महाडिक(224), मिराबाई काळे(215), माया मोरे(114),  शकू भोई, बाबूसिंग भोई, कुंडलिक गावले, सारिका महाडिक( बिनविरोध). •  पिंपळखुंटे- सरपंच - हणुमंत देवकर (813) सदस्य- सोमनाथ ढगे (280), मंगल वाघमारे(286), साधना गोफणे(295), संजय बोडरे (391), पवन पाटील (399), मंदोदरी कचरे(369), विजयसिंह पाटील (259), नम्रता नवगिरे (279), सखुबाई बोंगाळे (242). • अंबाड- सरपंच- मनिषा गाडे(683), सदस्य- भागवत कापरे (287), मधुकर गाडे (271), उषा कदम(294), कुंडलिक

कदम (208), आशा दळवी (224), सुलभा खांडे (212), भीमराव सरवदे(275), मिरा पांडगळे(308), राधिका कदम(313). • वडोली- सरपंच-अर्चना बंडगर(410), सदस्य- स्वाती चव्हाण(144), लक्ष्मी बागाव  (144), तानाजी गाडे(137), सुप्रिया जाधव (138), सुभाष लोकरे (207), स्वाती खडतरे(214), स्वाती सुरवसे(200). • टेंभुर्णी - सरपंच - प्रमोद कुटे (5410), सदस्य- हरी सटाले (835), सोनाली वाघे(761), कविता कोठारी (850), तानाजी येवले-पाटील (582), सुप्रिया जाधव (585), शैलेश ओहोळ(1215), सोमनाथ साळुंखे(1090), कोमल केचे (1102), गिरीषकुमार ताबे(761), धनाजी गोंदील (682), प्रियांका पोळ (759), औदुंबर देशमुख(1478), अश्‍विनी धोत्रे(1275), उषा देशमुख(1361), वैभव कुटे (1262), कुसुम लोंढे (1278), सुमन धोत्रे(1155) हे निवडून आले.