Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Solapur › सावंत परिवाराने सामुदायिक विवाह परंपरा जोपासावी 

सावंत परिवाराने सामुदायिक विवाह परंपरा जोपासावी 

Published On: Feb 19 2018 1:19AM | Last Updated: Feb 18 2018 10:52PMमाढा : वार्ताहर 

मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा ही परंपरा सावंत परिवाराने अखंडित जोपासावी.  नववधूंनी संकटात खंबीरपणे पतीच्या पाठीशी उभे राहावे. तर पतीने पत्नीला त्रास होणार नाही याची काळजी घेत आनंदाने संसार करा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवदांपत्यांना दिला. जयवंतराव सावंत प्रतिष्ठान वाकाव (ता. माढा) यांच्यावतीने परांडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर या कारखान्याच्या प्रांगणात रविवारी आयोजित अठराव्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ते  बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज व गिरीराज या सावंत बंधूसह एकशे अकरा जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. भावना गवळी, आ. मधुकर चव्हाण, आ. लक्ष्मणराव जगताप, आ. प्रशांत परिचारक, आ. दत्तात्रय सावंत, आ. नारायण पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील, माजी आ. ओमराजे निंबाळकर, राजन पाटील, विनायकराव पाटील, महादेव बाबर, विलास लांडे, राजेंद्र राऊत, दीपकआबा साळुंखे पाटील, रश्मी बागल, विलासराव घुमरे,

पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सिमाताई साळवे, शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, सोलापूर जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, धनंजय डिकोळे, सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, माढ्याचे माजी उपसभापती वामनभाऊ उबाळे, सोलापूर जि. प. चे माजी सभापती शिवाजी कांबळे, दादासाहेब साठे, राजाभाऊ चवरे, सुरेश बागल, संजय पाटील घाटणेकर, संजय पाटील भिमानगरकर, संजय कोकाटे, मुन्नाराजे मोरे, सुनील घुले पाटील, माजी पं स सदस्य सूर्यकांत शेंडगे, गजेंद्र सूर्यवंशी, रामचंद्र मस्के, जनरल मॅनेजर रवींद्र शेलार, यांचेसह टी.व्ही स्टार नितीश चव्हाण, शिवानी बोरकर, शशांक केतकर, पूजा पवार, पूजा सावंत, नेहा पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्यात  नवरा नवरीसाठी कपडे, मणीमंगळसूत्र आणि संसारोपयोगी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने मोफत दिले. विवाह मंडप, सुमारे अडीच लाख वर्‍हाडी मंडळींच्या भोजन व्यवस्थेसाठी भोजन कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी अशी सर्व चोख व्यवस्था करण्यात आली होती. या विवाह सोहळ्यासाठी ज्येष्ठ बंधू कालिदास सावंत, सुभाष सावंत उत्तम सावंत, प्रा. शिवाजीराव सावंत आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, अनिल सावंत, किरण सावंत, रवी सावंत, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनंजय सावंत, विजय, संजय, विक्रम सावंत ऋषिराज व ऋतुराज सावंत हे सावंत परिवारातील सदस्यांनी सर्व प्रतिष्ठीतांचे स्वागत केले.