Wed, Mar 20, 2019 08:30होमपेज › Solapur › मतदारसंघातील प्रत्येक गावात खासदार निधी

मतदारसंघातील प्रत्येक गावात खासदार निधी

Published On: Jul 09 2018 11:07PM | Last Updated: Jul 09 2018 10:31PMअकलूज : तालुका प्रतिनिधी

माढा लोकसभा मतदार संघातील सर्व गावात 100 टक्के निधी पोहोचला आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामे,पंढरपूर लोणंद रेल्वे व काही रेल्वे गेटची कामे सुरू आहेत. गावांनी मागणी केल्यानुसार निधी दिला आहे. माढा लोकसभा  मतदार संघातील 9 तालुक्यातील सर्व 846 गावांत 978 हायमास्ट दिवे,443 पिकअप शेड, 140 खुल्या व्यायाम शाळा देण्यात आल्याची माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. 

खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या खासदार निधीतून 2018-19 साठी माढा तालुक्यातील 23 गावांना खुल्या व्यायाम शाळा,14 गावांना हायमास्ट दिवे, 13 गावांना पिकअप शेड मंजुरीची पत्रेे खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी खा. मोहिते-पाटील बोलत होते. 

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात आयोजित कार्यक्रमास  माजी जि.प.सदस्य संजय पाटील, शिवाजीराव कांबळे, पृथ्वीराज सावंत, भारत पाटील, यशवंत शिंदे, मारुतराव जाधव, संदीप साठे, राजाभाऊ चौरे, विलासराव देशमुख, धनंजय मोरे, दत्तात्रय भिलारे यांच्यासह माढा तालुक्यातील विविध गावचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव कांबळे,   प्रा. ननवरे , दत्ता पाटील,  राजाभाऊ   चौरे   ,  संजय पाटील, भारत पाटील, पृथ्वीराज सावंत, बाळासाहेब पाटील, मारुती जाधव, धनंजय मोरे यांचीही भाषणे झाली.सूत्रसंचालन नितीन बनकर यांनी केले.