Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Solapur › पंढरपूर रेल्वे प्रश्‍नी खा. साबळेंचा पुढाकार

पंढरपूर रेल्वे प्रश्‍नी खा. साबळेंचा पुढाकार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर-मुंबई रेल्वे सेवा दररोज सुरू करण्यात यावी अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असून या मागणीकडे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी दुर्लक्ष केलेले असतानाच भाजपचेच राज्यसभा सदस्य खा. अमर साबळे यांनी मात्र याप्रश्‍नी थेट रेल्वे मंत्र्यांकडे गार्‍हाणे मांडले आहे. विशेष म्हणजे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे पंढरपूरकरांची मागणी खा. साबळेंच्यामाध्यमातून पुर्ण होण्याची शक्यता बळावली आहे. 

सोलापूर  लोकसभा    मतदारसंघातून 2014 साली मोदी लाटेत खा. शरद बनसोडे प्रचार न करतानही पावणे दोन लाखांचे मताधिक्य घेऊन दिल्लीला गेले होते. मोदी सरकारच्या माध्यमातून खा. बनसोडे विकास कामे खेचून आणतील अशी अपेक्षा पंढरपूरकरांना लागली होती. मात्र त्यांच्याकडून पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. गेल्या चार वर्षात खा. बनसोडे मोजून 4 वेळा पंढरपूरला आले असतील. पंढरपूरच्या प्रश्‍नावर त्यांनी लोकसभेत कधी तोंड उघडल्याचेही  दिसून आलेले नाही. त्याचबरोबर पंढरपूरकरांशी कसला संपर्कही ठेवलेला नाही. यामुळे पंढरपूरकरांतून खा. बनसोडे यांच्याविषयी नाराजी पसरली आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणूकीत पुन्हा बनसोडेंना उमेदवारी दिल्यास या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. 

दरम्यानच्या काळात राज्यसभा सदस्य खा. अमर साबळे(पान 1 वरून) यांनी मात्र पंढरपूर शहर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवला असून पंढरपूरच्या प्रश्‍नावर त्यांनी अनेक वेळा मंत्रीस्तरावर प्रयत्न केल्याचे  दिसून आले आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणूकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात खा. अमर साबळे हे भाजपचे उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. 
खा. साबळे यांनी पंढरपूरच्या प्रश्‍नात लक्ष घातल्यानंतर या तीर्थ क्षेत्राला 

मुंबईशी जोडणारी पंढरपूर-मुंबई ही दररोज प्रवाशी वाहतूक करणारी रेल्वे सेवा  दररोज सुरु करावी, अशी आग्रही मागणी  रेल्वेमंत्री पियुष गोयल  यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्र्यांनीही  ही मागणी तात्काळ मान्य  करून सकारात्मक प्रतिसाद  दिला आहे.   राज्यातून तसेच देशभरातून पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरात दाखल होतात. मुंबईहून पंढरपूरला येणार्‍या भाविकांना फारशी रेल्वे सुविधा नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होते.   यासाठी भाविक आणि प्रवाशांसाठी पंढरपूर- मुंबई ही दररोज रेल्वे सेवा सुरु करावी. येथे येणार्‍या भाविकांच्या संख्येत आणखी वाढ  होऊन पंढरपूरच्या विकासास हातभार लागणार आहे. पंढरपूर-मुंबई रेल्वे दररोज  सुरू करण्याबरोबरच पंढरपूर-पुणे (पालखी मार्गावरील) आणि पंढरपूर-कराड मुख्य मार्गावर असणार्‍या दोन रेल्वेच्या क्रॉसिंगवर नवीन उड्डाणपूल बाधण्यात यावा अशीही मागणी खा.साबळे यांनी ना.गोयल यांच्याकडे केली.  

पंढरपूर-मुंबई रेल्वेसेवा दररोज सुरू करण्याबाबत त्याचा आर्थिक व तांत्रिक अभ्यास करून ही सेवा लवकरच सुरू करण्यात येईल असे ना.गोयल यांनी  मान्य  केल्याची  माहिती यासंदर्भात पंढरपूरचे भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी खासदार साबळे यांच्याकडे  यासंदर्भात पाठपुरावा केला होता.  त्यामुळे हा प्रश्‍न  ऐरणीवर आला असून पंढरपूरकरांच्या खा. साबळे यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.

Tags : Solapur, Solapur news, MP, Sabale, lead, Pandharpur, railway, question


  •