Sat, Apr 20, 2019 08:47होमपेज › Solapur › शेतकर्‍यांच्या वीज प्रश्‍नावर आ. भालके यांनी ऊर्जामंत्र्यांना धरले धारेवर

शेतकर्‍यांच्या वीज प्रश्‍नावर आ. भालके यांनी ऊर्जामंत्र्यांना धरले धारेवर

Published On: Mar 22 2018 10:54PM | Last Updated: Mar 22 2018 10:18PMपंढरपूर : प्रतिनिधी

पेड पेंडिंगचे (विजेचे) कनेक्शन शेतकर्‍यांना पैसे भरूनही मिळत नाही. तर दुसरीकडे वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा वीज वितरणने सुरू केला आहे. याबाबत आक्रमक होत आ. भारत भालके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करीत सरकारला धारेवर धरले.

मंगळवेढा, पंढरपूर व सांगोला येथील शेतकर्‍यांनी पैसे भरूनही त्यांना वीजेचे कनेक्शन मिळत नाही. शेतकर्‍यांनी एका इन्फ्रा-2 चे पैसे ऊर्जा विभागाच्या महावितरण कंपनीच्या बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे परत गेले आहेत. परत गेलेले कामाचे पैसे परत देणार असल्याचे आदेश ऊर्जा मंत्र्यांनी  दिले होते. परंतु ते पैसे अद्यापही शेतकर्‍यांना परत मिळाले नाहीत. 

उन्हाळाला सुरू झाला असताना ऊर्जा विभागाकडून शेतकर्‍यांची विजेचे कनेक्शने तोडायचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची हाता तोंडाला आलेली पिके जळून जात आहेत. शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अधिकार्‍यांनी करू नये. ऊर्जा मंत्र्यांनी विजेचे कनेक्शन न तोडण्याचे आदेश देऊन  शेतकर्‍यांना दिलासा देणार का? असे आ.  भारत भालके यांनी विचारले. 

यावर उत्तर देताना  ऊर्जा मंत्री म्हणाले की,  इन्फ्रा-2 चे पैसे परत गेलेले आम्ही परत शेतकर्‍यांना दिलेले आहेत. इन्फ्रा-2 ची कामे आम्ही तातडीने पूर्ण करणार आहोत. सध्या पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये विजेच्या कनेक्शनची पेड पेडिंगची प्रकरणे सुमारे 43 हजार प्रलंबित आहेत. 

जिल्हा वाईज नियोजन करून या वर्षाच्या ऑक्टोबर अखेरीस वीज जोडण्याचे प्रलंबित प्रकरणे पूर्ण करून देणार आहे. शेतकर्‍यांच्या विजेचे कनेक्शन तोडण्याबाबतचा निर्णय थांबवून संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही ऊर्जा मंत्र्यांनी दिली.

या उत्तराने समाधानी न झालेल्या  सभागृहातील काँग्रेस, राष्ट्रवादी व विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभात्याग करून विधीमंडळाचे मुख्य द्वाराजवळील पायर्‍यांवर सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणा देऊन ठिय्या आंदोलन केले. 

आ. भारत भालके यांनी सरकार विरोधाच्या घोषणेचा फलक घेऊन सरकार विरोधी आक्रमक भूमिका घेतली. व शेतकर्‍यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विजेच्या प्रश्‍नावर सरकारला धारेवर धरले.
Tags : MLA bharat bhalke  electricity minister