Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Solapur › आमदार रमेश कदमांना जामीन; तरीही तुरुंगातच!

आमदार रमेश कदमांना जामीन; तरीही तुरुंगातच!

Published On: Jan 21 2018 3:14PM | Last Updated: Jan 21 2018 3:34PMमोहोळ : पुढारी ऑनलाईन

लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले मोहोळचे आमदार रमेश कदम यांना ईडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, ईडीकडून दिलासा मिळाला असला तरी याप्रकरणात सीआयडीने देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याने त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी मोहोळ पोलिस ठाणे परिसरातील जप्‍त केलेली वाहने धुवून त्यांच्या सुटकेची तयारी चालवल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.  

आमदार रमेश कदम हे लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे महामंडळात ३१५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. महामंडळाचे चेअरमन असताना त्यांनी त्यात अपहार केल्याच्या आरोपात त्यांच्यावर ईडी व सीआयडीने गुन्‍हे दाखल केले आहेत. त्यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या गुन्‍ह्यातून त्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. 

आमदार कदम यांच्यासह या प्रकरणातील अन्य चौघांना या प्रकरणी अटक न करण्याची विनंती करणारा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना वैयक्‍तिक बाँड मिळू शकतो.

रमेश कदमांना तुरुंगातच रहावे लागणार

ईडी कोर्टाने रमेश कदमांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्यावर सीआयडीनेही गुन्‍हा दाखल केला आहे. याच प्रकरणात त्यांना सीआयडीने अटक केली आहे. त्यामुळे सध्या तरी आमदार कदम यांच्या सूटकेची शक्यता धुसरच आहे. सीआयडीने ऑगस्‍ट २०१५ मध्ये आमदार कदम यांना अटक केल्यापासून ते तरुंगातच आहेत. 

कार्यकर्त्यांकडून सुटकेची तयारी

रमेश कदम आमदार झाल्यानंतर त्यांनी तालुक्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकर, बोअरवेल्‍स मशीन घेतली होती. त्यांना घोटाळ्यात अटक झाल्यानंतर ही वाहने जप्‍त करून मोहोळ पोलिस स्‍थानक परिसरात लावण्यात आली आहेत. ईडी कोर्टाकडून जामीन मिळाल्याचे वृत्त आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ही वाहणे धुण्यास सुरुवात केली आहे. 

Image may contain: outdoor

Image may contain: one or more people, tree and outdoor

Image may contain: one or more people, people standing, tree, sky and outdoor