Sat, Jul 20, 2019 11:19होमपेज › Solapur › हिंदूंनी संघटित होणे गरजेचे : आ. राजासिंह ठाकूर

हिंदूंनी संघटित होणे गरजेचे : आ. राजासिंह ठाकूर

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 9:51PMसोलापूर : प्रतिनिधी

धर्मांधांकडून हिंदूंचे शोषण होत आहे. त्यामुळे जैन, मारवाडी, राजस्थानी, गुजराती, मराठी आणि हिंदूंच्या अन्य जातींनी संघटित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीतर्फे पुंजाल मैदान येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सनातन संस्थेच्या संत सद्गुरू स्वाती खाड्ये, पश्‍चिम महाराष्ट्र संघटक  मनोज खाड्ये आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निलेश सांगोलकर यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला आमदार राजासिंह ठाकूर, सनातनच्या संत सद्गुरू स्वाती खाड्ये, समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटक मनोज खाड्ये आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निलेश सांगोलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर वेणूगोपाल जिल्ला पंतलू, भानुचंद्र चिप्पा, व्यंकटेश श्रीमल, श्रीनिवास जिल्ला यांनी वेद मंत्रपठण केले. कृतीशील हिंदुत्वनिष्ठावंतांचा सत्कार आमदार आणि गोरक्षक राजासिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

ठाकूर म्हणाले, महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने येथील सर्व पशूवधगृहे बंद करावीत. धर्मासाठी एकत्र येण्याची वेळ येईल त्यावेळी पद, पक्ष, जातपात सर्व विसरून एकत्र यायला हवे. या हिंदू धर्मजागृती सभेसे शहर व जिल्ह्यातील स्वयंसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिजित देशमुख यांनी केले. आभार संजय इंगळे यांनी मानले.