होमपेज › Solapur › भगवान महावीरांच्या विचारांची गरज : अनेकांतसागरजी

भगवान महावीरांच्या विचारांची गरज : अनेकांतसागरजी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अकलूज : तालूका प्रतिनिधी

‘जगा आणि जगू द्या’ व अहिंसा परमो धर्माची शिकवण देणार्‍या भगवान महावीरांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे    दिगंबर जैन धर्मगुरू आचार्य श्री 108 अनेकांतसागरजी महाराज यांनी सांगीतले. विसाहुमड दिगंबर जैन मंदिर येथे प्रवचन प्रसंगी ते बोलत होते. अकलूज व संग्रामनगर परिसरात  श्री 1008  भगवान महावीरांचा जन्मोत्सव  आचार्यश्री अनेकांतसागरजी महाराजांच्या सान्निध्यात प्रभावना पूर्वक संपन्न झाला. सकाळी महावीरांच्या प्रतिमेची पालखी सुवाद्य मिरवणूकीसह परिसरातून पार पडली.

यावेळी अध्यक्ष प्रद्युम्न गांधी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 वाजता आचार्यजींचे प्रवचन, महावीरांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक, दुपारी महावीर शहा यांचे वतीने महाप्रसाद व सायंकाळी भगवान महावीरांचा नामकरण विधी पार पडाला. जैन महिला मंडळाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
रवींद्र फडे, इंद्रराज दोशी, सुनील दोशी, संतोष फडे, राजकुमार दोशी, हर्षकुमार फडे, इंद्रजीत फडे, सत्यजीत दोशी, आशिष फडे, संदीप फडे, वैभव फडे, सतीश व्होरा यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संग्रामनगर येथे ही जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. सकाळी महावीरांच्या प्रतिमेच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पंचामृत अभिषेक संतोष भालेराव, पूनम भालेराव यांचे हस्ते झाला. महाप्रसाद ही समाजाच्या वतीने देण्यात आला.सायंकाळी महावीराचा नामकरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. गुलाब पिंपरकर, पप्पू कुपाडे, शितल मगदूम, सागर भालेराव, पिंटू उपाध्ये, आण्णा जैन, अजय पाटील, बबलु कुपाडे,   रुकुबदास कंगळे, अन्नदाते गुरुजी यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.

Tags : Solapur, Solapur News, Lord Mahaviras, thought,  AnekantSagarJi


  •