Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Solapur › लोकोपायलट यांचे रेल्वे स्टेशनवरच उपोषण

लोकोपायलट यांचे रेल्वे स्टेशनवरच उपोषण

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 17 2018 10:30PMसोलापूर : प्रतिनिधी

 लोकोपायलट व सहायक लोकोपायलट यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापूर रेल्वे स्टेशनवरच  उपोषण  सुरू  केले  आहे. या आंदोलनामुळे वरिष्ठ अधिकारी व रेल्वेचालकांमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. रेल्वे स्टेशनवरच हे 48 तासांचे उपोषण सुरू असल्याने प्रवाशांमध्येही याबाबत चर्चा दिसून येत होती.

ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या करत सोलापूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 1 वर 48 तासांचे उपोषण सुरू केले आहे.

रेल्वेचालक संघटनेच्या (एआयएलआरएसए) पदाधिकार्‍यांनी   केलेल्या मागणीनुसार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल लोकोपायलट काहीही न खाता काम करत आहेत तसेच मायलेज दर आरएसी 1980 च्या नियमानुसार निर्धारित करण्यात यावे, 1 जाने.2016 च्या पूर्वी  सेवानिवृत्त झालेल्या रनिंग स्टाफची पेन्शन निर्धारण सातव्या वेतन आयोगानुसार तुलनात्मक करण्यात यावे, एनपीएस रद्द करून जुनी पेन्शन रद्द करण्यात यावी, सहायक लोकोपायलट यांच्या वेतनमानात सुधारणा करण्यात यावी व रिस्क अलाउन्स सर्वांना देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या.  

या आंदोलनात ए. बी. रसाळ, व्ही. एम. पाटील, जे. एस. बनकर, व्ही.डी. स्वामी, रोहन माने आदींनी सहभाग घेतला आहे. हे उपोषण 48 तासांचे असल्याने उपोषणार्थींनी रेल्वे स्टेशनवरच ठिय्या मारला आहे.