Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Solapur › लिंगायत धर्म मान्यतेसाठी परळीत राज्यव्यापी बैठक

लिंगायत धर्म मान्यतेसाठी परळीत राज्यव्यापी बैठक

Published On: Aug 08 2018 10:31PM | Last Updated: Aug 08 2018 10:31PMसोलापूर : प्रतिनिधी

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या  महत्त्वाच्या मागण्यांकरिता  राज्यव्यापी बैठक परळीत आयोजित केली असल्याची माहिती  बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

समितीचे मुख्य मार्गदर्शक डॉ. शिवलिंग शिवाचार्य महास्वामी (अहमदपूर) यांच्या उपस्थितीत 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता वक्रेश्‍वर मंदिर, ज्योतिर्लिंग वैजीनाथ मंदिरजवळ (ता. परळी, जि. बीड)  येथे बैठक  होणार असल्याची माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी यावेळी दिली.

आजपर्यंत महाराष्ट्रातील आठ प्रमुख शहरांत लाखोंच्या संख्येने लिंगायत महामोर्चे काढण्यात आले आहेत; परंतु अद्यापही महाराष्ट्र शासनाने योग्य ती दखल घेतलेली नाही. इतर समाजाच्या  आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्यात, त्याचबरोबर लिंगायत धर्म मान्यतेबाबत त्वरित विचार करावा, याबाबत विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जनआंदोलनांची दिशा ठरवणे भाग पडले आहे व योग्य दिशा देण्याचे काम या बैठकीत होणार असल्याचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले. 

या बैठकीस अखिल भारतीय लिंगायात समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर (नांदेड), महाराष्ट्र राज्य समन्वयक माधवराव पाटील-टाकळीकर (लातूर), मराठावाडा विभागाचे समन्वयक प्रदीप बुरांडे (औरंगाबाद), समन्वयक समितीचे सदस्य प्रा. राजेश विभुते (लातूर), आत्मलिंग शेटे (परळी), प्रा. सुनील हेंगणे (अहमदपूर), वीरेंद्र मंगलगे (औरंगाबाद), बी.एस. पाटील (कोल्हापूर), सुधीर सिंहासने (सांगली), राजेंद्र अलमखाने (पुणे), डॉ. अशोक मेनकुदळे (यवतमाळ), कैलास वाघमारे (वर्धा), प्रा. आनंद कर्णे (नांदेड), चेतन सौंदळे (परळी) आदी राज्यभरातून सर्व समन्वय समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

यावेळी पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष सकलेश भाबुळगावकर, सोलापूर युवक अध्यक्ष अमित रोडगे, धोंडप्पा तोरणगी, सिध्दाराम कटारे, प्रा. शिवलिंग अचलेरे, प्रा. हर्षवर्धन पाटील, मयूर स्वामी आदी उपस्थित होते.

11 ऑगस्ट रोजी लिंगायत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार
संवैधानिक मान्यतेसाठी व अल्पसंख्याक दर्जासाठी लिंगायत समाजाची 11 ऑगस्ट रोजी परळीत राज्यव्यापी बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये राज्यभरात जनआंदोलनाची  दिशा ठरवली जाणार आहे. आजतागायत महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांत लिंगायत महामोर्चे झाले आहेत. इतर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा; परंतु लिंगायत धर्माचादेखील त्वरित विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.