Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांनी लिंगायत समाजाची माफी मागावी

सहकारमंत्र्यांनी लिंगायत समाजाची माफी मागावी

Published On: Apr 04 2018 11:58PM | Last Updated: Apr 04 2018 11:52PMसोलापूर : प्रतिनिधी

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वक्‍तव्याचा शिवा संघटना जाहीर निषेध करत आहे. त्यांनी येत्या दोन दिवसांत लिंगायत समाजाची जाहीर माफी मागावी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा  शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्‍वरांचे नाव देण्याची मागणी सोलापुरातील वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी केलेली आहे. शिवा संघटनेच्या नेतृत्वाखाली यासाठी केलेल्या व्यापक आंदोलनात सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय समाजबांधवांनी सहभाग नोेंदविल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने अन्य नाव देण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे चिडून जाऊन सहकारमंत्री देशमुख यांनी वीरशैव लिंगायत समाजबांधवांची कुचेष्टा करणारी वक्‍तव्ये लातूर येथील एका सभेत केल्यामुळे समाजबांधवांचा अवमान झाला आहे. या वक्‍तव्याबद्दल देशमुख यांनी दोन दिवसांत जाहीर माफी मागावी; अन्यथा शिवा संघटनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. बगले यांनी दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष संतोष केंगनाळकर, अरविंद भडोळे-पाटील, सिद्धाराम यलशेट्टी, सिद्धाराम नंदर्गी आदी उपस्थित होते.