Wed, Jan 16, 2019 18:25होमपेज › Solapur › लीड स्कूलचे सुमित मेहता यांना शैक्षणिक मार्गदर्शनासाठी परदेशात आमंत्रण

लीड स्कूलचे सुमित मेहता यांना परदेशात आमंत्रण

Published On: May 30 2018 11:11PM | Last Updated: May 30 2018 10:59PM करमाळा : तालुका प्रतिनिधी

येथील लीड स्कूलचे संचालक  सुमित यशपाल मेहता यांना झुरीच, स्वित्झर्लंड येथे आयोजित ‘जागतिक शाळा मंच 2018’ मध्ये शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आल्याची माहिती लीड स्कूलच्या मुख्याध्यापिका बनश्री सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली. लीड स्कूलची कार्यपद्धती व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर केला जातो, याबद्दल माहिती देण्यासाठी मेहता यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

‘जागतिक शाळा मंच’ ही एक जागतिक स्तरावरील नावीन्यपूर्ण व उत्तम दर्जाच्या शाळांची नेटवर्क संस्था आहे. यात सहभागासाठी भारतातून आमंत्रित केलेले लीड स्कूलचे मेहता हे  एकमेव संचालक आहेत. यामध्ये लीड स्कूलमधून राबवत असलेल्या उत्तम उपक्रम, अध्ययन अध्यापन पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल मेहता सादरीकरण करतील. याबद्दल लीड शाळेच्या करमाळा कुर्डुवाडी व अक्कलकोट या शाखेत मेहता यांचा सत्कार करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका सूर्यवंशी यांनी सांगितले.