Tue, Jul 07, 2020 23:31होमपेज › Solapur › गारमेंट उद्योगासाठी सोलापुरात मोठे मनुष्यबळ

गारमेंट उद्योगासाठी सोलापुरात मोठे मनुष्यबळ

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 9:24PM

बुकमार्क करा
सोलापूर: प्रतिनिधी

 सोलापूर हे गारमेंट उद्योगासाठी मोठे हब बनत आहे व गारमेंट क्षेत्रासाठी मोठे मनुष्यबळ उपलब्ध आहे, असे मत क्यूमॅक्स  वर्ल्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील टिबरेवाल यांनी मांडले आहे. हॉटेल बालाजी सरोवर येथे शालेय गणवेश क्षेत्रातील कंपनी क्यूमॅक्सचे एकदिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यामध्ये कंपनीच्या पदाधिकार्‍यांनी सोलापूरच्या वाढत्या उद्योगाबद्दल आपले मत व्यक्त केले.
देशातील युनिफॉर्म उत्पादनाच्या  क्षेत्रात अत्यंत नावाजलेल्या क्यूमॅक्स मिलने गणवेश कापडाच्या उत्पादनासाठी व विक्रीसाठी सोलापूरची निवड केली आहे.

सोलापुरात गारमेंट तयार करणारे उत्तम  कारागीर आहेत व मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. क्यूमॅक्स कापड कंपनीकडून गणवेश तयार करताना अधिकाधिक उत्कृष्ट दर्जाचे कापड कसे होईल याकडे लक्ष दिले जात आहे. यामध्ये मुख्यता मुलांच्या त्वचेची काळजी घेण्यात येते तसेच त्याचा टिकाऊपणा आणि रंगही निरंतर टिकावा याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.सोलापूर मनपा शाळा क्रमांक 8 च्या शालेय विद्यार्थ्यांना क्यूमॅक्स वर्ल्ड कंपनीकडून गणवेश वाटप करण्यात आले.

सोलापुरात क्यूमॅक्सचे अधिकृत विक्रेते प्रकाशचंद डाकलिया यांची निवड करण्यात अली आहे. हॉटेल बालाजी सरोवर येथे गणवेश प्रदर्शन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर उद्योगपती राम रेड्डी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुनील टिबरेवाल, अंकित टिबरेवाल, प्रकाशचंद डाकलिया व विजयकुमार डाकलिया आदी उपस्थित होते.