Thu, Jun 27, 2019 17:46होमपेज › Solapur › संमती नाही तोपर्यंत जमीन अधिग्रहण करता येत नाही: राजू शेट्टी

संमती नाही तोपर्यंत जमीन अधिग्रहण करता येत नाही: राजू शेट्टी

Published On: Feb 28 2018 1:11AM | Last Updated: Feb 27 2018 9:00PMमाळशिरस : तालुका प्रतिनीधी 

विकास कामासाठी शेतकरी संमती देत नाही. तोवर त्याची जमीन अधिग्रहण करता येत नाही. त्यामुळे सरकार शेतकर्‍यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे उभा करणार असेल तर आम्ही ते मनोरे पाडून टाकू असे प्रतिपादन खा. राजू शेट्टी यांनी भांबुर्डी (ता. माळशिरस) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

यावेळी अनिल पवार, अमर कदम, अमोल हिप्परगे, विशाल काळे, राहुल बिडवे, समाधान गायकवाड, प्रा. जयंत बगाडे, देवीदास वाघमोडे, रामचंद्र कचरे, रविंद्र मोटे, मेळाव्याचे संयोजक काकासाहेब मोटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना खा. शेट्टी म्हणाले की, सरकार अनेक महामार्गासाठी पैसे दिले असे सांगत असले तरी फक्‍त टेंडर काढण्याचे काम झाले असून टेंडर घेणारे पैसे घालणार आहेत. परत आपल्यावर टोलची धाड घालणार आहेत. 

अधिग्रहण केलेल्या जमिनीला बाजार भावाच्या पाचपट रक्कम द्यावी असा कायदा आहे, परंतु सरकार लोकाना फसवत आहे. त्यासाठी तुमच्या घामाचे पैसे मिळण्यासाठी एकत्र या व तरुणांची फळी निर्माण करा. सर्वांनीच शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचाही आरोप खा. शेट्टी यांनी केला. 

सदाभाऊंच्या गाडीवर दगड फेकणार्‍या युवकाचा सत्कार
खा. राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता या पुढे गद्दारांना पक्षात स्थान मिळणार नाही असे सांगितले, तर सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक करणार्‍या रुदरे (ता. माढा) येथील बापूसाहेब गायकवाड या कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्याच्या खांद्यावर कौतुकाची थाप टाकली.