Sun, Jul 21, 2019 00:12होमपेज › Solapur › १९ फेब्रुवारी हीच खरी शिवजयंती ः बागल

१९ फेब्रुवारी हीच खरी शिवजयंती ः बागल

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 10:13PM

बुकमार्क करा

कुर्डुवाडी ः प्रतिनिधी

भाजप-शिवसेना सरकारकडून  शिवजयंतीचा वाद वाढविण्याचे कारस्थान सुरु आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला दिशाहिन करण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे. 19 फेब्रुवारीलाच सर्वत्र शिवजयंती साजरी होणार असून तिथीनुसारच तुमच्या पित्याचीही जयंती साजरी करा, अशी टीका शिवव्याख्याते हर्षल बागल यांनी केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भाजप आ. सुरेश हाळवणकर यांनी छत्रपती शिवरायांची जयंत्ती 8 एप्रिल रोजी साजरी करण्याची तारखेची मागणी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर बागल यांनी ही टीका केली आहे.

राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून जगातली पहिली शिवजयंत्ती साजरी केली. याबद्दल इतिहास संशोधकांकडे डझनभर पुरावे उपलब्ध आहेत. ज्यांनी तिथीचा आग्रह केला त्यांनी आपले वाढदिवस व आपल्या पित्याच्या जयंत्या व पुण्यस्मरण तिथीलाच घालावे, अशी जहरी टीका बागल यांनी केली. 19 फेब्रुवारीला मराठा मोर्चा महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चा समिती तसेच प्रत्येक जिल्हा समितीनेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही 19 फेब्रुवारीलाच होणार असल्याचे ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मंजूर केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात 
एकाच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार, असा विश्‍वास व्याख्याते बागल यांनी व्यक्त केला आहे.