Fri, Mar 22, 2019 01:42
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › उभ्या टँकरला धडकून कारमधील तिघे ठार

उभ्या टँकरला धडकून कारमधील तिघे ठार

Published On: May 02 2018 10:49PM | Last Updated: May 02 2018 10:28PMकुर्डुवाडी : प्रतिनिधी

रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या मळीच्या टँकरला धडकून कारमधील दोघे जण जागीच ठार झाले, तर एक जण उपचार सुरू असताना मृत झाला. हा अपघात टेंभुर्णी-कुर्डुवाडी रस्त्यावरील अंबाड गावाजवळ सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास झाला. याबाबत कुर्डुवाडी पोलिसांत नोंद झाली आहे.

संजय महादेवराव चव्हाण, अरुण महादेव हाडके, महावीर सुभाष पगारिया (तिघे रा. अंबेगाव बु., पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. श्रीकांत अशोक सातपुते यांनी पोलिसांत खबर दिली. सोमवारी रात्री स्कोडा कार (क्र. एमएच 12 एचएक्स 9369) मधून तिघे अंबेगावहून टेंभुर्णी-कुर्डुवाडी रस्त्यावरुन प्रवास करीत होते. 8.30 च्या सुमारास अंबाडजवळील रंगोली हॉटेलजवळ आल्यानंतर रस्त्यावर डाव्या बाजूला नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या मळीच्या टँकरला कारने जोरदार धडक दिली. या धडकेत कार चक्काचूर झाली, तर कारमधील संजय चव्हाण व अरुण हाडके हे जागीच ठार झाले. महावीर पगारिया हे बार्शीतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत झाले. अंबाड येथील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या टँकरचालकावर व मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.