Fri, Apr 19, 2019 08:05होमपेज › Solapur › कुर्डुवाडी रेल्वेस्थानकास मानांकन

कुर्डुवाडी रेल्वेस्थानकास मानांकन

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:19PMकुर्डुवाडी : प्रतिनिधी

‘स्वच्छ रेल व स्वच्छ भारत’ या अहवालांतर्गत राज्यातील मानांकनप्राप्त 26 अ श्रेणी रेल्वेस्थानकांत कुर्डुवाडी स्थानकाने मानांकन प्राप्त केले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही मानांकनप्राप्त यादी जाहीर केली आहे.

देशातील मानांकनप्राप्त 407 स्थानकांची नावे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केली आहेत.त्यामध्ये श्रेणी अ-1 देशातील एकूण 75 स्थानकांची, तर त्यापैकी राज्यातून एकूण 10 स्थानकांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील श्रेणी अ-1 मध्ये 10 स्थानकांतून सोलापूर जिल्ह्याचा समावेश झाला आहे. तर अ श्रेणीमध्ये देशातून 332 स्थानकांची मानांकन यादी जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील 26 रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. या 26 स्थानकांत कुर्डुवाडी रेल्वेस्थानकानेही स्थान पटकाविले आहे. याबाबत समस्त कुर्डुवाडीकरांनी आनंद व्यक्त केला.

रेल्वेस्थानकातील स्वच्छता, कचर्‍याची विल्हेवाट, ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले डस्टबीन, वायफाय सेवा, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ कँटिन, वेटिंग रूम, प्रसाधनगृह, रेल्वेस्थानकावरील शौचालय स्वच्छता, दोन रुळांमधील स्वच्छता आदींचा विचार करुन मानांकन करण्यात आले. यासाठी केंद्रीय कमिटी कुर्डुवाडी येथे 3 दिवस तळ ठोकून होती. त्यांनी दिलेल्या गुणांवरुन ही श्रेणी देण्यात आली आहे.