Thu, Apr 25, 2019 21:30होमपेज › Solapur › कुर्डूवाडी बार्शी रस्त्यावर दुधाचे दोन टेम्पो फोडले 

कुर्डूवाडी बार्शी रस्त्यावर दुधाचे दोन टेम्पो फोडले 

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:25PMकुर्डूवाडी: तालुका प्रतिनिधी 

कुर्डूवाडी बार्शी रस्त्यावरील रिधोरे गावानजीकच्या आरडा पुलावर नेचर या कंपनीचे दोन टेम्पो भरलेल्या पिशव्या दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले. 

दुधाला दर नसल्याने दूध उत्पादक शेतकरी पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर दूध बंद आंदोलन पुकारले आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनाची कर्मभूमी असलेल्या माढा तालुक्यात हे दुसरे आंदोलन आहे .  रविवारी नेचर कंपनीचा दुधाच्या पिशव्या भरलेला टेम्पो रात्री अकरा वाजता पुण्याकडे चालला होता तोही अडवून त्यातील दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले होते.  

दूध बंद आंदोलनाचा दुसर्‍या दिवशी मंगळवारी बार्शी येथुन पुण्याकडे नेचर कंपनीचे दोन मोठे टेम्पो दुधाच्या पिशव्या घेऊन निघालेले होते ते टेम्पो रिधोरे गावानजीक येतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक आंदोलकांनी ते टेम्पो अडवून त्यातील हजारो पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या .  यानंतर हे आंदोलक पसार झाले .  दुधाची वाहतूक करायची असेल तर पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पोलिसांची परवानगी घेऊनच हे वाहतूक करावी अशी विनंती दूध संघ संचालकांना केली होती . परंतु पोलिसाच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून नेचर कंपनी दुधाची वाहतुक करत आहे त्यामुळे त्यांना हे परिणाम भोगावे लागले .