होमपेज › Solapur › शेळवेत कृषीदिनानिमित्त वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण

शेळवेत कृषीदिनानिमित्त वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण

Published On: Jul 01 2018 1:01PM | Last Updated: Jul 01 2018 1:01PMशेळवे (पंढरपुर) : वार्ताहर

येथे रत्नाई कृषि महाविद्यालय अकलुज यांच्या वतीने शेळवे ता.पंढरपुर येथे कृषीदिन ,वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रमाचे आयोजन आज (रविवार दि. १ )करण्यात आले होते. रत्नाई महाविद्यालयाचे कृषीदूत पुढच्या ४ महिन्यात गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाग घ्यावा असे गावचे सरपंच राजलक्ष्मी लोखंडे यांनी सांगितले.

कृषीदूत म्हणुन रत्नाई कृषि महाविध्यालयाचे प्रथमेश खंदारे, साजिद आत्तार,  रोहन सांगडे,  आशिष ढमढेरे,  ओमकार माने,  शाहरुख तांबोळी,  सुकुमार भगत,  रोहित भोसले, व जॉकी रिचर्डस बॅच्यू हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील ,रत्नाई कृषि महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी पी कोरटकर, प्राचार्य आर जी नलावडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्राचार्य एस एम एकतपुरे व कार्यक्रम अधिकारी प्राचार्य एस आर आडत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम झाला.

कृषीदिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेळवे गावचे सरपंच राजलक्ष्मी लोखंडे या होत्या. तर उपसरपंच रमेश गाजरे तसेच ग्रामसेवक सतिश चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य व शेळवे ग्रामस्थ उपस्थित होते.