Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Solapur › योगासने करून निरोगी राहा : रामदेव बाबा

योगासने करून निरोगी राहा : रामदेव बाबा

Published On: Mar 21 2018 12:24AM | Last Updated: Mar 20 2018 11:41PMअक्‍कलकोट : वार्ताहर

योगी हा सर्वदलीय व निर्दलीय असतो, त्याचे कोणी वेगळे अर्थ काढून आपला अमूल्य वेळ वाया न घालवता योगा करा, निरोगी रहा, असे आवाहन  योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. 19 मार्च रोजी फत्तेसिंह क्रीडांगणावर विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित योग चिकित्सा व ध्यान शिबिराच्या समारोपप्रसंगी योगगुरू रामदेव बाबा बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर पतंजली योगपीठाच्या महिला प्रभारी सुमनादीदी,  ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश पटवारी, लोकमंगल शुगरचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील, ष.ब्र.डॉ. जयसिद्धेेश्‍वर महास्वामी, सदगुरू चिकरेवणसिद्ध शिवशरण महास्वामी, मनिप्र अभिनव शिवलिंग महास्वामी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, अविनाश महागावकर, सुधा अळ्ळीमोरे, शांभवी कल्याणशेट्टी, रुपाली शहा, अतुल भोसले, श्रीशैल प्रधाने, अजयकुमार पाटील, बापू पडाळकर, श्रीराम लाखे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना रामदेवबाबा म्हणाले, प्राण हेच माता, पिता, सखा आहे व प्राण हेच सर्वस्व आहे. म्हणून प्रत्येकांनी रोज प्राणायाम करणे काळाची गरज असल्याचे सांगून माणूस संपत्तीने मोठा होत नसून संकल्पनेने मोठा होतो. म्हणून प्रत्येकांनी जीवनात संकल्पना केली पाहिजे. आशा हेच जीवन आहे, निराशा हेच मृत्यू आहे. मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो की नरकात जातो, याची चिंता करण्यापेक्षा पृथ्वी हेच स्वर्ग आहे आणि नरकही आहे. तुमचे कर्म चांगले असतील तर फळ चांगले मिळतील. योगसेवा हेच राष्ट्रसेवा आहे. मी सेवा निरंतर करणार आहे. तुम्हीही करा. योगाचे प्रसार व प्रचार स्वत:च्या घरापासून करा. प्रत्येकांनी आपल्या जीवनात तीन निष्ठा ठेवली पाहिजे. गुरू निष्ठा, ध्येयनिष्ठा व कर्तव्य निष्ठा यामुळे आपल्याला सफलता मिळण्यास मदत होईल. आपल्या जीवनात कितीही संकटे येतील जातील. योगा करत रहा. आपली सर्व संकटे आपोआप दूर होतील. वाईट मार्गाचा अवलंब करु नका आणि पापाचा भागीदार बनू नका. मी गेल्या तीन दिवसांपासून अक्कलकोट येथे घेतलेल्या योग शिबिराची गुरुदक्षिणा म्हणून मला तुमचे सर्व व्यसन माझ्या झोळीत टाकून निर्व्यसनी व्हा व निरोगी रहा, असे आवाहन 
केले.

यावेळी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित कल्याणशेट्टी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिबिरार्थींना योगाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या मिलन कल्याणशेट्टी, सिध्दाराम टाके, प्राचार्य बसवराज गुरशेट्टी, विकास तळवार, धनंजय गाढवे, नागेश कलशेट्टी, डॉ. बसवराज चिकणेकर, खंडेराव घाटगे, प्रितम पवार, अप्पाशा पुजारी, राजेश कोळी, ईरण्णा करवीर, सिध्दाराम मसुती या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा  रामदेव बाबा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Tags : Keep Yoga For healthy Life Says Ramdev Baba In Akkalkot Solapur District