Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Solapur › करमाळा बहुसंख्य ग्रा.पं.वर शिवसेनेचा झेंडा

करमाळा बहुसंख्य ग्रा.पं.वर शिवसेनेचा झेंडा

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 9:16PM

बुकमार्क करा
करमाळा ः प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील दुसर्‍या टप्प्यात झालेल्या 13 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना आ. नारायण पाटील यांच्या गटाने घवघवीत यश संपादन केले आहे. 13 पैकी 8 ग्रामपंचायतींची सत्ता आ. पाटील गटाकडे मोठ्या मताधिक्क्याने मतदारांनी दिली आहे. तर जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे गटाकडे 4 ग्रा.पं.ची सत्ता आली आहे. माजी आ. शामल बागल गटाकडे रामवाडी, भगतवाडी, गुलमोहरवाडी या ग्रामपंचायतीची सत्ता आली असून मौजे उंदरगाव, राजुरी, केत्तूर या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य पदावर आमच्या गटाचे बहुमत असल्याचा दावा बागल गटाकडून करण्यात आलेला आहे.
आ. पाटील गटाकडे लोकसंख्येने मोठे असलेल्या मौजे जेऊर, निंभोरे, घोटी, गौंडरे, उंदरगाव, केत्तूर, राजुरी, भगतवाडी अशा 8 ग्रा.पं.ची सत्ता आली आहे. जि.प. अध्यक्ष शिंदे गटाकडे मौजे वीट, कंदर, चिखलठाण, कोर्टी आदी 4 ग्रा.पं.च्या मतदारांनी दिलेल्या आहेत. माजी आ. बागल गटाकडे रामवाडी ग्रा.पं. सत्ता मतदारांनी दिलेली आहे.

पाटील गटाकडे जनतेने झुकते माप दिल्याचे स्पष्ट झाले असून तालुक्याच्या राजकारणात शिंदे गटाला चांगले दिवस आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ग्रामीण भागामध्ये जनतेवर पकड असलेल्या बागल गटाला दुसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. जेऊर ग्रा.पं.वर पाटील गटाची सत्ता मतदारांनी एकहाती दिली आहे. 25 वर्षांपासून जेऊर ग्रा.पं.वर पाटील गटाचा झेंडा फडकत असताना याही निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांच्याकडे सत्ता दिल्यामुळे जेऊर ग्रा.पं.मध्ये पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे - जेऊर ग्रा.पं.  ः सरपंचपदी संगीता साळवे (1991 मते, विजयी),  प्रभाग क्र.1 मधून नागेश झांझुर्णे (543 मते), सुलभा घाडगे (498 मते), ललिता धनंजय शिरसकर (482 मते), प्र.क्र.2 मधून योगेश करनवर  (416 मते), बलभीम जाधव (386 मते), नदाफ परवीन (385 मते), प्र.क्र.3 मधून अंगद दशरथ गोडसे (333 मते), सुहास कांडेकर (358 मते), प्र.क्र.4 मधून विनोद गरड (531), सविता लोंढे (481 मते), संदीप कोठारे - (511 मते), शैला वाघमोडे - (593 मते).

 जेऊर ग्रा.पं.ची एकहाती सत्ता मतदारांनी आ. पाटील गटाकडे सुपूर्द केली आहे. चिखलठाण ग्रा.पं.मध्ये जि.प.अध्यक्ष शिंदे यांच्या गटाकडे मतदारांनी एकहाती सत्ता दिली आहे.सरपंचपदी माजी संचालक चंद्रकांत किसन सरडे हे 1 हजार 887 मते मिळवून विजयी झाले आहेत, तर प्र.क्र.1 मधून अमोल मराळ (415), जयश्री श्रीराम पोळ (438), शोभा रमेश जाडकर (432), प्र.क्र.2 आण्णासाहेब सरडे - (416), पद्मीन मारकड (427), रामेश्‍वर सरडे (380), प्र.क्र.3 दादासाहेब सरडे (448), लक्ष्मी सावळकर - (451), पंचफुला सरडे - (559), प्र.क्र.4 सोमनाथ राऊत - (302), श्रीनाथ गव्हाणे - (310), प्र.क्र.5 भागवत मारकड - (257), सुमन गव्हाणे - (283) मते मिळवून विजयी झालेले आहेत. केत्तूर ग्रा.पं.वर आ. नारायण पाटील यांच्या गटाची सत्ता आली असून या निवडणुकीत सरपंच पदासाठी विलास कोकणे हे 1 हजार 647 मते मिळवून विजयी झाले.

केत्तूर ग्रा.पं.मध्ये  प्र.क्र.1 मधून छाया राऊत - (623), लोचना येडे - (600), चंद्रकांत कानतोडे - (584), प्र.क्र.2 सुवर्णा चव्हाण - (328), प्रशांत नवले - (279), प्र.क्र.3 सुप्रिया जरांडे - (429), कावेरी नगरे - (395), लक्ष्मण खैरे - (340), प्र.क्र.4 पांडुरंग कनिचे - (352), सुवर्णा निकम - (381), हरिश्‍चंद्र खाटमोडे - (375) मते मिळवून विजयी झालेले आहेत. कंदर ग्रा.पं.वर जि.प.अध्यक्ष शिंदे यांच्या गटाची सत्ता आली असून या निवडणुकीत सरपंचपदी मनिषा  भांगे यांना 1818 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. निवडणुकीत प्र.क्र.1 मधून दिलदार मुलाणी - (339), सुषमा शिंदे - (331), छाया निकम - (256), प्र.क्र.2 मौला मुलाणी - (510), इरफान जहागिरदार - (539), प्रभावती झोळे - (436), प्र.क्र.3 अमोल मांगले - (402), छाया जगताप - (426), सुजाता माने - (397), प्र.क्र.4 सचिन यादव -(408), सुनंदा गुरव - (404), हिरावती इंगळे - (408), प्र.क्र.5 दीपक घोडके - (301), संतोष माने - (276), चंबुबाई लांडगे - (293) मते मिळवून विजयी झाल्या.

घोटी ग्रा.पं.वर आ. पाटील गटाची सत्ता आली असून सरपंचपदी सविता राऊत यांना 1132 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. प्र.क्र.1 मधून संजय ननवरे (272), मालन ननवरे - (236), संगिता ननवरे - (237), प्र.क्र.2 बालाजी जाधव - (290), नंदा झेंडे - (291), कावेरी राऊत - (293), प्र.क्र.3 योगेश म्हेत्रे - (300), अलका चिंदे - (312), सविता राऊत - (308), प्र.क्र.4 अनिल थोरात - (172), रमेश दुधे - (174) मते मिळवून विजयी झालेले आहेत. निंभोरे ग्रा.पं.वर आ. पाटील गटाची सत्ता आली असून सरपंचपदी जनाबाई कांबळे यांना 1 हजार 55 मते मिळवून विजयी झाल्या. प्र.क्र.1 मधून सोमनाथ फरतडे - (325), सुवर्णा गवळी - (336), सुरेखा वळेकर - (280), प्र.क्र.2 ज्योतीराम वळेकर - (269), विजया मारकड - (296), भिवरा वळेकर - (274), प्र.क्र.3 मारूती काळदाते - (253), शोभा जमदाडे - (240), सारिका वाघमारे - (274), प्र.क्र.4 बाळासाहेब मारकड -(215), जवाहरलाल लुणावत - (231) मते मिळवून विजयी झाले.

कोर्टी ग्रा.पं.वर अपक्ष म्हणून उभा असलेले उमेदवार निलेश कुटे यांना 1 हजार 313 मते मिळून ते विजयी झाले.  प्र.क्र.1 मधून निलेश गोसावी - (311), कालिका कुसकर - (319), प्र.क्र.2 वंदना जाधव - (386), स्वाती धुमाळ - (206), प्र.क्र.3 देविदास हुलगे - (363), सिताबाई कारंडे - (456), सगीता जाधव - (291), प्र.क्र.4 दत्तात्रय मेढे - (421), मीरा जाधव - (466), सरस्वती शेरे - (481), प्र.क्र.5 अनुप चव्हाण - (290), रूपचंद गावडे - (394), मंदाबाई वायदंडे - 380 मते मिळवून विजयी झालेल्या आहेत. वीट ग्रा.पं.वर जि.प.अध्यक्ष संजय शिंदे गटाची सत्ता आलेली असून यामध्ये उदय ढेरे हे सरपंच म्हणून विजयी झालेले आहेत. या निवडणुकीत सहा ग्रामपंचायत सदस्य हे शिंदे गटाचे, दोन सदस्य बागल गटाचे, तर एक सदस्य पाटील गटाचा विजयी झालेला आहे.