Thu, Apr 18, 2019 16:28होमपेज › Solapur › करमाळा बाजार समिती निवडणुकीत रंगत

करमाळा बाजार समिती निवडणुकीत रंगत

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 11:02PM29 वर्षे विरोधकांनी बाजार समितीत स्वार्थ साधला : बागल
करमाळा : तालुका प्रतिनिधी 

तब्बल 29 वर्षे शेतकर्‍यांच्या हक्काच्या बाजार समितीत विरोधकांनी स्वतःचा स्वार्थ साधला. याची प्रचिती आपण जवळून पाहत आहोत. याच बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताची आम्ही भूमिका घेऊन शेतकरी हिताचे निर्णय घेऊन दाखवू, असे प्रतिपादन आदिनाथ कारखान्याच्या मार्गदर्शक, संचालिका रश्मी बागल- कोलते यांनी केले. त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडून पोथरे येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव  विलासराव घुमरे, आदिनाथचे माजी चेअरमन व  पॅनलप्रमुख गुरुदास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना रश्मी बागल- कोलते म्हणाल्या की, विरोधकांनी केलेल्या अभद्र युतीने शेतकर्‍यांना फसवण्याचे काम केले आहे. हे सर्व सर्वसामान्यांच्या व शेतकरी हितासाठी लढणार्‍या बागल गटाच्या विरोधात हे एकत्र आले आहेत. याची जाणीव तालुक्यातील प्रत्येक मतदार शेतकर्‍याला झाली आहे. हाच शेतकरी मतदार वर्ग निवडणुकीतून सत्ता बदलाची नांदी ठरवेल. बागल गटाचे सर्व  उमेदवार हे शेतकर्‍यांच्या विकासासाठी कटिबध्द राहतील, अशी ग्वाही रश्मी बागल-कोलते यांनी दिली. 

तत्पूर्वी बागल गटाचे श्रद्धास्थान असणार्‍या शक्तीस्थळावर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. हाच फोडलेला नारळ बाजार समितीच्या सत्तेत नेणार असल्याचा निर्धार रश्मी बागल यांनी व्यक्त केला. 

पोथरे येथील आयोजित बैठकीत पोथरे गणाचे उमेदवार दिग्विजय बागल म्हणाले की, लोकांच्या आग्रहाखातर  आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. 
आपण विरोधकांना दिलेल्या आव्हानाला घाबरुन विरोधक गण सोडून दुसर्‍या गणात गेले हाच आपला विजय आहे. बागल गटाला विजयी गटाचा वारसा आहे. त्यामुळे आपण जिद्दीनेच लढणार आहे.  बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांचे मार्गदर्शन गटासाठी मोलाचे असल्याने आम्ही यात नक्कीच विजयी होऊ, असा ठाम विश्‍वास दिग्विजय बागल यांनी यावेळी व्यक्त केला. 

या प्रचार शुभारंभास बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, गटाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, सर्वच गणाचे उमेदवार आदी बागल गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आधी विकासकामे नंतर मतांचा जोगवा मागतो : शिंदे
आधी सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन नंतरच मतांचा जोगवा मागण्यासाठी आम्ही प्राधान्य देतो, असे प्रतिपादन शिंदे गटाचे युवा नेते धनराज शिंदे यांनी केले.
ते पोथरे येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल शिंदे, शहाजी झिंजाडे, धनंजय पाटील, आण्णा झिंजाडे, आप्पा नाईकनवरे, भोजराज सुरवसे, दत्तात्रय आढाव, शामराव झिंजाडे, रंगनाथ झिंजाडे, भाऊसाहेब झिंजाडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व भा.ज.प.युतीचे कृ.उ.बा. समितीच्या निवडणुकीत पोथरे शेतकरी गणातील उमेदवार सुनील भगवान सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माढा पंचायत समितीचे सदस्य धनराज दादा शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. यावेळी  बबन जाधव, सावळा झिंजाडे, विठ्ठल इवरे, सोमनाथ नाळे, नितीन गायकवाड, हरिश्‍चंद्र झिंजाडे,  आढाव, भाऊसाहेब जाधव, रमेश शिंदे, पप्पू नंदरगे, देवीदास वाघ, नगरसेवक संजय सावंत, राजू आवाड, बारीक जाधव, लाला जाधव, संदीप पाटील, बाबुराव आढाव, बापू काळे, तुकाराम सोरटे, सुनील पाटील, परमेश्वर भोगल, प्रकाश शिंदे, शिवाजी नरूटे, अर्जुन भोगले, नंदू इरकर आदी मान्यवर उपस्थित होते.                  
यावेळी पोथरे शेतकरी गणातील उमेदवार सुनील सावंत, कन्हैयालाल देवी, आदिनाथ भोगडे, शहाजी झिंजाडे आदींची भाषणे झाली. यावेळी मतदारांना मार्गदर्शन करताना माढा पंचायत समितीचे सदस्य धनराज दादा शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी पोथरे मतदारसंघात लाखो रुपयांच्या विकास कामासाठी निधी दिलेला आहे. आम्ही कुणावर टिका टिप्पणी करण्यापेक्षा अगोदर कामे करतो आणि मगच मत मागतो. त्याचप्रमाणे सुनील सावंत यांनी या गावासाठी अगोदर काम केले. मांगी तलावाच्या पाण्यासाठी आंदोलन व संघर्ष केला. आपल्या सुख-दुःखात सावंत परिवार सदैव पुढे असतो. त्यांना कृ.उ.बा. समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रतिनिधित्व द्यावे, असे आवाहन युवा नेते धनराज शिंदे यांनी  केले. यावेळी पोथरे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.