होमपेज › Solapur › करकंबचे स.पो.नि. दीपक पाटील यांच्या निलंबनाची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

करकंबचे स.पो.नि. दीपक पाटील यांच्या निलंबनाची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

गेल्या 6 वर्षांपासून करकंब पोलिस ठाण्यात तळ ठोकून असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना तत्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे थेट गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकहे करण्यात आली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडेही या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, करकंब पोलीस ठाण्यास गेल्या 6 वर्षांपासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक  दिपक पाटील यांच्या कार्यपद्धतीविषयी नागरिकांतून तीव्र स्वरूपाची नाराजी पसरली आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असून वाळू तस्करीही जोमात आहेत. सपोनि पाटील यांचे कार्यक्षेत्रातील अवैध गोष्टींवर कसलेच नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने या करकंब पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात धाडी टाकून अवैध व्यवसायांचा पर्दाफाश केलेला आहे.

एका कारवाईमध्ये थेट पोलीस कर्मचारीच आढळून आलेला आहे. अशा प्रकारे अनागोंदी कारभार सुरू असतानाही गेल्या 6 वर्षांपासून काही महिन्यांचा कालावधी वगळता दिपक पाटील यांना कायम ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्या बदलीची अनेक वेळा मागणी झालेली असूनही वरिष्ठांकडून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आता आरोप होऊ लागला आहे. यासंदर्भात पटवर्धन कुरोली येथील  दादासाहेब गोरख चव्हाण यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.तसेच दिपक पाटील यांना निलंबीत करावे अन्यथा 10 एप्रीलपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. 

Tags : Solapur, Solapur News, Karkamb, Demand,  PSI, Deepak Patil, suspension


  •