होमपेज › Solapur › 'पात्र शाळा व ज्युनियर कॉलेज च्या वाढीव पदांसाठी ७२ कोटींची तरतूद'

'पात्र शाळा व ज्युनियर कॉलेज च्या वाढीव पदांसाठी ७२ कोटींची तरतूद'

Published On: Jul 04 2018 5:15PM | Last Updated: Jul 04 2018 5:15PMकरकंब : प्रतिनिधी 

राज्यातील १ व २ जुलै २०१६ ला अनुदानास पात्र प्राथमिक,  माध्यमिक शाळेतील ८९७० शिक्षकांना २० टक्केप्रमाणे  वेतन वितरित करण्यासाठी ६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ज्युनियर कॉलेज च्या १७१ वाढीव पदांसाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती  आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.

राज्यातील “कायम  विनाअनुदान”  तत्वावर परवानगी  दिलेल्या  व अनुदानास  पात्र घोषित  केलेल्या  मान्यताप्राप्त  खाजगी  प्राथमिक व माध्यमिक  शाळांना  द्यावयाच्या  अनुदान  सूत्रामध्ये सुधारना  करुन  सरसकट २० टक्के प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय 19 सप्टेंबर, 2016 ला घेण्यात आला  होता. त्यानुसार 1628  शाळा  व 2452  तुकडयांवरील 19247  शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट  20%  प्रमाणे  अनुदान मंजूर  करण्यात आले होते. त्यानंतर दि  1  व 2  जुलै,  2016  ला  अनुदानास  पात्र  घोषित केलेल्या  शाळा  व   तुकडयांना   20%  प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय दि ९ मे २०१८ रोजी घेण्यात  आला.  त्यानुसार  प्राथमिक शाळेतील १४१७ पदांसाठी व माध्यमिक शाळेतील ७५५३ पदांसाठी ६४ कोटी९८ लाख  रुपये तरतूद करण्यात आली आहे. नागपूर येथील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक तरतूद करण्यात आल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे 51 शाळा व 19 शाळांमधील वर्ग तुकड्यांना अनुदान यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांची तपासणी पूर्ण होत आली असून, त्यांना ही अनुदानाची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करीत असून  अघोषित शाळा व तुकड्यांची यादी घोषित होण्यासाठी तसेच त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल अशी माहिती शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.