Thu, Jul 02, 2020 19:57होमपेज › Solapur › छ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा

छ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा

Published On: May 06 2018 1:11AM | Last Updated: May 05 2018 11:25PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंह महाराज भोसले यांच्या कुटुंबाच्या मालकी वहिवाटीच्या नवी लोटेवाडी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील जमिनी देखभालीसाठी दिल्या असताना या जमिनीचे कोणतेही खरेदी-विक्रीचे अधिकार दिले नसतानाही गुन्हेगारी कट करून केवळ स्वत:च्या फायद्यासाठी 14 हेक्टर 33 आर जमीन बनावट दस्त तयार करुन गाव कामगार तलाठ्याशी संगनमत करून स्वत:च्या मुलाच्या नावे केले व मिळकतदाराची विश्‍वासाने फसवणूक केली. याप्रकरणी श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा रतनचंद शहा बँक व सद‍्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे संचालक, माजी सरपंच उत्तम मारुती खांडेकर, मुलगा अविनाश उत्तम खांडेकर यांच्यासह अन्य एकावर सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंह महाराज भोसले यांच्या कुटुंबाच्या मालकी वहिवाटीच्या नवी लोटेवाडी (ता.सांगोला) येथे अनेक जमिनी आहेत. त्याच्या देखभालीचे काम नवी लोटेवाडी (ता. सांगोला) येथील उत्तम मारुती खांडेकर यांच्यावर सोपवले होते. मात्र, याकामी मी व माझी मुलगी राजकुमारी मनिषाराजे प्रतापसिंह महाराज भोसले असे आम्ही दोघींनी त्यास कोणतेही जमीन खरेदी-विक्रीचे लेखी अधिकार कधीही दिले नसताना उत्तम मारुती खांडेकर यांनी आमची मालकी वहिवाटीमधील जमीन मुलगा अविनाश उत्तम खांडेकर यास 18 डिसेंबर 2008 रोजी खरेदीदस्ताने दिली आहे. वास्तविक याबाबत मी व माझी मुलगी मनिषाराजे भोसले यांनी उत्तम मारुती खांडेकर यांना कधीही कोणतेही अधिकार दिले नसताना तो अधिकार असल्याचे भासवून खोटा दस्तऐवज तयार केला.

याबाबत त्यांनी गुन्हेगारी कट करुन बनावटरित्या जमीन विक्री करून आमची फसवणूक व विश्‍वासघात केला तर गाव कामगार तलाठ्याशी संगनमत करून स्वत:च्या फायद्याकरिता 250 चौ. मीटर क्षेत्रात त्याचे नाव लावून घेतले आहे. उत्तम खांडेकर यांनी एवढ्यावरच न थांबता नवी लोटेवाडी येथील जमिनीबाबत काही गुन्हेगारी कृत्य केले असल्यास व तसे आमच्या निदर्शनास आल्यास पोलिस प्रशासनास माहिती देण्यात येईल, असे फिर्यादीत नमूद केले आहे.