Tue, Mar 19, 2019 15:31होमपेज › Solapur › अर्धा एकरावर साकारली शिवरायांची रांगोळी प्रतिमा

अर्धा एकरावर साकारली शिवरायांची रांगोळी प्रतिमा

Published On: Feb 19 2018 1:19AM | Last Updated: Feb 18 2018 10:57PMकळंब : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त शहरातील क्रीडा संकुल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 हजार 200 स्क्वेअर फुटची भव्य प्रतिमा रांगोळीतून एकट्या कलाकाराने साकारली आहे.

कळंब येथील श्रीमंतयोगी युवा मंचाने यासाठी पुढाकार घेतला होता. या रांगोळीचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नितीन कटेकर यांच्या हस्ते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कळंबचे तहसीलदार अशोक नांदलगावकर, युवक काँग्रेसचे  सरचिटणीस अनंत लंगडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भागवत धस, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, ठेकेदार विलास पाटील,  उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, रोहितराजे दंडनाईक, नगरसेविका मिनाक्षीताई हजारे, नगरसेवक अमर गायकवाड, रिपाइं नेते डी. जी. हौसलमल, भाजपचे शहराध्यक्ष संदीप बावीकर, जि.प. सदस्य बालाजी जाधवर, नगरसेवक अमर गायकवाड, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश टोणगे, डॉ. रमेश जाधवर, डिकसळ ग्रा.पं. सदस्य कुणाल मस्के, प्रा. संजय घुले, सुमित बलदोटा, ज्योती सपाटे, तनपुरे ताई यांच्यासह शहरातील नागरिक, महिला उपस्थित  होते. 

 पूर्व-पश्‍चिम 120 आणि दक्षिण उत्तर 160 अशी एकूण 19200 स्के.फूट रांगोळी राजकुमार दत्तात्रय कुंभार या एकट्या कलाकाराने साकारली आहे.  शिवाजी महाराज यांची रांगोळीतून शिवप्रतिमासाठी 4720 किलो रांगोळी लागली आहे.ही रांगोळी 31 तास आणि 45 मी. पूर्ण करण्यात आली  आहे. या रांगोळीसाठी श्रीमंतयोगी युवा मंचाचे अध्यक्ष राहुल कुंभार, चेतन बनसोडे, अभिषेक पवार, ऋषिकेश पवार, नितीन सावंत, विशाल कुंभार, योगेश अंधारे आदींनी परिश्रम घेतले आहे.