Wed, Aug 21, 2019 02:06होमपेज › Solapur › सोलापूर : जय मार्कंडेयच्या निनादात रथोत्सव रंगला

सोलापूर : जय मार्कंडेयच्या निनादात रथोत्सव रंगला

Published On: Aug 26 2018 10:29PM | Last Updated: Aug 26 2018 9:07PMसोलापूर : प्रतिनिधी 

डॉल्बीचा दणदणाट, लेझीमचा खणखणाट, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि जय मार्कंडेयच्या जयषोत आज मार्कंडेय रथोत्सव उत्साहात पार पडला.

नारळीपोर्णिमेनिमित्त पूर्वभागात राहणार्‍या सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या पद्मशाली समाजाचा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या रथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री विजयुकमार देशमुख, खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणीती शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, महापालिकेतील विरोधी पक्षनेता तथा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांच्या हस्ते झाले.

मार्कंडेय मंदिरापासून, विजापूरवेस,भारतीय चौक, रत्नामारुती चौक, जगदंबा मंदिर चौक, पद्मशाली चौक, दत्तनगर, मार्कंडेय रुग्णालय, जोडबसवण्णा, गणेशपेठ शॉपिंग सेंटर, समाचार चौक, माणीक चौक, विजापूर वेस मार्गे पुन्हा मार्कंडेय मंदिरात रथाचा समारोप झाला.

सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरु झालेला हा रथ सायंकाळी चारच्यासुमारास पद्मशाली चौकात आला. यावेळी पद्मशाली समाजातील  अनेक संस्थासंघटनांचे रथ रथयात्रेस सहभागी झाले. त्यामुळे दत्त नगरपासून ते पद्मशाली चौकापर्यंत एकामागे एक टॅक्टर अन त्यावरील भव्य दिव्य देखाव्यांची रांग लागली होती.

कोण्या मंडळाीतल लेझीमचा संघ तर कुणाचे ढोल पथक, कुणाचा डॉल्बीवर मुक्त नाचणारे कार्यकर्ते तर कुठे टॅ्रक्टरवर केलेला स्टेजवरील तयारीचा डान्स परफॉर्मन्स अशा वातावरणांनी वातावरणात उत्साहाचा रंग भरला गेला.

ओम साई प्रतष्ठिान,पद्मजल्लोष, महालक्ष्मी मित्र मंडळ,विवेकानंद शक्ती प्रयोग, दत्तात्रय लेझील संघ, पवन यलदंड मित्र मंडळ, जयसंतोषी माता गोशाळा, महिला झांडपथक  या संस्थांच्या वेगळ्या रथांनी आणि लेझीम, झांड, नृत्य पथकांनी  रथोत्सव सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले होते.

रथोत्सव यशस्वी करण्यासाठी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव सुरेश फलवारी, उपाध्यक्ष बालराज बोल्ली, अशोक इंदापूरे, डॉ. राजेंद्र गाजूल,काशिनाथ गड्डम, गोपीकृष्ण  वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल,विजया वड्डेपल्ली, पांडुरंग दिड्डी, पुरुोषत्त बोबत्ती, विजय नक्का, मुरलीधर आरकाल, नरसय्या इप्पाकायल, रामकृष्ण कोंड्याल, रामचंद्र जन्नू, दशरथ गोप, सिध्देश्‍वर कमटम आदींनी परिश्रम घेतले.